मुंबईत घर घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण मेहनतदेखील घेत असतो आणि अशीच मेहनत घेत एका मराठी कलाकाराने त्याचे नवीन घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. हा अभिनेता म्हणजे बिग बॉस मराठी फेम अक्षय केळकर. ‘बिग बॉस मराठी ४’ चा विजेता व अभिनेता अक्षय केळकरने काही दिवसांपूर्वी मुंबईत त्याचं स्वत:चं नवीन घर घेतलं. याबद्दल सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर करत त्याने चाहत्यांना घराची आनंदाची बातमी दिली होती.
‘माझं मुंबईतील पहिलं घर’ असं म्हणत त्याने हा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. “२०२३ मध्ये सगळ्या सुंदर गोष्टी आयुष्यात घडल्या, त्यातली खूप सुंदर व अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मुंबईत माझं स्वतःच घर. काही वर्षांपूर्वी जेव्हा या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या ५ मित्रांबरोबर म्हाडाच्या बिल्डींगमध्ये रूम शेअर करून भाड्याने राहत होतो. त्याच म्हाडाच्या मुंबईच्या प्रकल्पामध्ये यावर्षी अर्ज केला होता आणि सोडतीमध्ये मी विजेता ठरलो” असं म्हणत त्याने त्याच्या नवीन घराची खास झलक शेअर केली होती.
आणखी वाचा – तुळ राशीसह ‘या’ ५ राशींसाठी सोमवारचा दिवस फायद्याचा, संपत्तीत होणार भरघोस वाढ, जाणून घ्या…
त्यानंतर काही दिवसांनी त्याच्या नवीन घराच्या पूजेचाही खास व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये त्याने पूजा व वस्तुशांतीची झलक पाहायला मिळाली होती. अशातच अक्षयने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्याचे घर साकारत येत असल्याचे पाहायला मिळत आहे. अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्या नवीन घराच्या सजावटीची झलक पाहायला मिळत आहे. यामध्ये अभिनेत्याच्या घराच्या पाटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
आणखी वाचा – एकीकडे रुपाली घेत आहे घरातल्यांची काळजी तर दुसरीकडे इंद्राणीकडून श्लोकाचे वाचन, अस्तिकट्टयार मिळणार का?
‘बिग बॉस’च्या घरात मिळालेली नावाची पाटी अक्षयने स्वत:च्या घरालाही लावली आहे. त्याचबरोबर आकर्षक इंटीरिअर व सजावटीच्या व शोभेच्या वस्तूही अक्षयचया नवीन घराची शोभा वाढवत आहेत. त्याचबरोबर स्वामी समर्थ, गणपती बाप्पा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्त्याही त्याच्या घरात शोभून दिसत आहेत. त्याचबरोबर त्याच्या घराच्या खिडकीतून बाहेरच्या निसर्गसौंदर्याचीही खास झलक पाहायला मिळत आहे. ‘लवकरच माझ्या घराची खास झलक दाखवणार आहे” असं म्हणत त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान, अक्षयच्या या नवीन घराबद्दल त्याला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी व चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.