गुरूवार, जून 5, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“संवेदनशील, नीडर, रोखठोक…” उत्कर्ष शिंदेची जितेंद्र जोशीसाठी खास पोस्ट, कौतुक करत म्हणाला, “माझ्यासाठी कलाविश्वात गुरुस्थानी…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 14, 2023 | 6:14 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
bigg boss marathi fame utkarsha shinde shared a post praising marathi actor jitendra joshi

“संवेदनशील, नीडर, रोखठोक...” उत्कर्ष शिंदेची जितेंद्र जोशीसाठी खास पोस्ट, कौतुक करत म्हणाला, “माझ्यासाठी कलाविश्वात गुरुस्थानी...”

‘बिग बॉस मराठी’मधून घराघरांत पोहोचलेला कलाकार म्हणजे उत्कर्ष शिंदे. उत्कर्षने आजवर आपल्या गाण्यामुळे, अभिनयामुळे व त्याच्या खास लेखनशैलीने सर्वांच्याच मनात स्थान निर्माण केलं आहे. उत्कर्ष हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्याचे अनेक फोटो व कामाबद्दलची काहीही अपडेट तो सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. अशातच त्याने अभिनेता जितेंद्र जोशीबद्दलची एक खास पोस्ट शेअर केली आहे. उत्कर्षने त्याच्या इन्स्टाग्रामवर जितेंद्रबरोबरचे काही खास फोटो शेअर केले आहेत आणि या फोटोखाली त्याने भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. (Utkarsh Shinde On Instagram)

या पोस्टमध्ये त्याने असे म्हटले आहे की, “निसर्ग तुमच्या उत्कर्षासाठी आपोआप गोष्टी घडवतो अस माझं मत आहे. चार्ल्स डार्विनने ‘सक्षम ते जगतील’ “survival of fittest” असं सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. म्हणजेच जे सजीव त्यावेळच्या पर्यावरणास जुळवून घेण्यास सक्षम असतील तेच सजीव पुढील काळात जगतील असे त्यांनी या सिद्धांतात मांडले आहे. माझ्या आयुष्यातही असाच एक चार्ल्स डार्विन आहे. गुरुस्थानी ठेवावी अशी व्यक्ती म्हणजे ‘द जिंतेंद्र जोशी’. मराठीची उत्तम समज असलेला, संवेदनशील अभिनेता, नीडर वक्ता व रोखठोक व्यक्तिमत्त्व म्हणजे जितेंद्र जोशी. आतापर्यंत त्याने ‘सेक्रेड गेम्स’, ‘गोदावरी’, ‘नाळ-२’ अशा अनेक उत्कृष्ट कलाकृती केल्या आहेत. आपल्या अभिनय, गीत व कवितांमधून मराठी सिनेविश्वाला काहीतरी वेगळं देणारा आणि माझ्यासाठी कलाविश्वात गुरुस्थानी असणारा कलाकार म्हणजे जितेंद्र जोशी. नेहमी भेटल्यावर मोठ्या भावाप्रमाणे आधी काळजीपोटी माझ्या खांद्याच्या झालेल्या दुःखापतीची नुसती विचारपूस न करता स्वतः शोल्डर मूवमेंट स्ट्रेंथट्रेनिंग करुन घेणारा, ‘उत्कर्ष तू आता अभिनय क्षेत्रात आला आहेस त्यामुळे खूप काम कर आणि कामात मज्जा-आनंद घे असं सांगणारा कलाकार म्हणजे जितेंद्र जोशी.”

View this post on Instagram

A post shared by Dr Utkarsh Anand Shinde (@utkarshshindeofficial)

आणखी वाचा – Video : सासूबाईंना पाहताच पटकन पाया पडले अन्…; क्रांती रेडकरने शेअर केला नवऱ्याचा खास व्हिडीओ, समीर वानखेडेंच्या संस्कारांचं होतंय कौतुक

यापुढे त्याने असं म्हटले आहे की, “जगण्याच्या ह्या स्पर्धेत सजीव एकमेकांशी स्पर्धा करत असतात. ही स्पर्धा जीवघेणी असते. या स्पर्धेमध्ये जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच जीव टिकतो. कारण निसर्गामध्ये सुयोग्य म्हणजेच योग्य असेच जीव जगतात व बाकीचे जीव मरतात असा डार्विनचा सिद्धांत आहे. याप्रमाणेच नकळतपणे गप्पा मारत मला मार्गदर्शन करणारा, मराठी सिनेमाची दिशा समजवून सांगणारा, स्पर्धा, संघर्ष, मेहनतबद्दल व प्रेक्षकांच्या आवडी-निवडीबदल सतर्कता ठेव सांगणारा, अभिनय क्षेत्रात दिशा, नियमितपणाचे महत्व सांगत संस्कार करणारा. सुतारपक्ष्याचं उदाहरण देत ‘लगे रेहनेका भाई बाकी सब होजाता है’ म्हणजेच सगळं विसरून, कामात झोकून द्यायचं. मग स्वतःची त्या झाडात सुंदर कुपी तयार होतेच, असं सांगणारा, आकाशाला गवसणी घातलेला जमिनीवरचा माणूस, असा हा माझा गुरुस्थानी असलेला मोठा भाऊ. माझा चार्ल्स डार्विन म्हणजे जितू दादा.”

आणखी वाचा – Video : वांद्रेमध्ये रस्त्याशेजारी वडापाव-भजीपाव खाताना अश्विनी भावेंना भलताच आनंद, व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, “पाटीलचा वडापाव…”

दरम्यान, उत्कर्षने इन्स्टाग्रामवर ही मोठी पोस्ट लिहीत त्याने जितेंद्रचे कौतुक केले आहे. तसेच या पोस्टला अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. तसेच कमेंट्समध्ये चाहत्यांनी उत्कर्ष व जितेंद्र या दोन्ही कलाकारांचे कौतुक केले आहे.

Tags: entertainmententertainment newsjitendra joshimarathi actormarathi entertainmentMarathi newsutkarsh shinde
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

"थोडीतरी लाज बाळगा", ६६ वर्षीय नीना गुप्तांनी ओलांडल्या वयाच्या मर्यादा, बोल्ड लूक पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, "म्हातारपणात..."
Entertainment

“थोडीतरी लाज बाळगा”, ६६ वर्षीय नीना गुप्तांनी ओलांडल्या वयाच्या मर्यादा, बोल्ड लूक पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, “म्हातारपणात…”

जून 5, 2025 | 12:48 pm
Anushka Sharma On RCB Victory Parade Turns Stampede
Entertainment

बंगळुरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू अन्…; विराट कोहली पाठोपाठ अनुष्का शर्माची प्रतिक्रिया, म्हणाली…

जून 5, 2025 | 12:01 pm
Vivek oberoi on bengaluru stampede
Entertainment

बंगळुरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यूचं तांडव, विवेक ओबरॉयची पोस्ट, म्हणाला, “जवळच्या माणसांना गमावणं…”

जून 5, 2025 | 11:28 am
 Hina Khan Trolled After Marriage
Entertainment

“तुझ्या नवऱ्याने इस्लाम धर्म स्वीकारला का?”, आंतरजातीय लग्न करताच हिना खान ट्रोल, नेटकरी म्हणाले, “तुझ्या आईने…”

जून 5, 2025 | 11:20 am
Next Post
Kareena Kapoor On Intimate Scene

'कुर्बान'मधील सैफ अली खानबरोबरच्या सेक्स सीनबाबत करीना कपूरने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही आधीपासूनच…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.