१२ जुलैला देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट लग्नबंधनात अडकले. यामुळे त्यांच्या लग्नाची चर्चा चहूबाजूने होतं आहे. सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाच्या फोटो आणि व्हिडीओंनी धुमाकूळ घातला आहे. या सोहळ्यासाठी जगभरातील अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे बॉलीवूडमधीलही सर्व कलाकार अंबानी कुटुंबाच्या सोहळ्यात आनंदाने सहभागी झाले होते. लग्न झाल्यानंतर पुढील दोन दिवसही हा सोहळा सुरु होता. १३ जुलै व १४ जुलै रोजी दोघांच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
याबद्दल अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच एका बातमीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. केआरकेने मुकेश अंबानीने बॉलीवूड अभिनेता जावेद जाफरी यांचा मुलगा मिजान जाफरीला ३० कोटी रुपयांचे घर गिफ्ट म्हणून दिल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. स्वतः जावेददेखील हे ऐकून आश्चर्यचकीत झाले., केआरकेने मिजान जाफरीबद्दल बोलताना सांगितले की, “अभिनेता जावेद जाफरी यांचा मुलगा मिजान हा मुंबईमधील वांद्रे येथील संधु पॅलेसमध्ये राहत आहे. यांचे कारण म्हणजे मुकेश यांनी त्याला ३० कोटी रुपयांचे घर गिफ्ट केले आहे.

याबद्दल एका मराठी अभिनेत्याने अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्यावर मार्मिक पोस्ट लिहिली आहे. ‘बिग बॉस मराठी’ फेम जय दुधाणे त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या बातमीचा स्क्रीनशॉट पोस्ट करत “खूप गरीब असल्यासारखं वाटत आहे” असं म्हटलं आहे. जय दुधाणेची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जयच्या या पोस्टने पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
आणखी वाचा – कुंभ, धनू, मकर व मीन राशीच्या लोकांना मंगळवारी होणार धनलाभ, व्यवसायात नवीन संधी मिळणार, जाणून घ्या…
दरम्यान, अनंत-राधिका यांच्या लग्नामध्ये झालेल्या खर्चावर अनेक कलाकार त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. सौरभ गोखले या अभिनेत्यानेदेखील अनंत-राधिका यांच्या लग्नाबद्दल अनेक मार्मिक पोस्ट शेअर केल्या असून त्यांच्या पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.