सोमवार, मे 12, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जावेद जाफरीच्या मुलाला अंबानींकडून ३० कोटींचे घर दिल्याच्या वृत्तावर, ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “खूप गरीब…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 16, 2024 | 9:30 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi fame actor Jay Dudhane said that he feels very poor on the news that Ambani gave a house worth 30 crores to Javed Jaffrey's son.

जावेद जाफरीच्या मुलाला अंबानींकडून ३० कोटींचे घर दिल्याच्या वृत्तावर, 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, "खूप गरीब..."

१२ जुलैला देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट लग्नबंधनात अडकले. यामुळे त्यांच्या लग्नाची चर्चा चहूबाजूने होतं आहे. सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाच्या फोटो आणि व्हिडीओंनी धुमाकूळ घातला आहे. या सोहळ्यासाठी जगभरातील अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे बॉलीवूडमधीलही सर्व कलाकार अंबानी कुटुंबाच्या सोहळ्यात आनंदाने सहभागी झाले होते. लग्न झाल्यानंतर पुढील दोन दिवसही हा सोहळा सुरु होता. १३ जुलै व १४ जुलै रोजी दोघांच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता.

याबद्दल अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच एका बातमीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. केआरकेने मुकेश अंबानीने बॉलीवूड अभिनेता जावेद जाफरी यांचा मुलगा मिजान जाफरीला ३० कोटी रुपयांचे घर गिफ्ट म्हणून दिल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. स्वतः जावेददेखील हे ऐकून आश्चर्यचकीत झाले., केआरकेने मिजान जाफरीबद्दल बोलताना सांगितले की, “अभिनेता जावेद जाफरी यांचा मुलगा मिजान हा मुंबईमधील वांद्रे येथील संधु पॅलेसमध्ये राहत आहे. यांचे कारण म्हणजे मुकेश यांनी त्याला ३० कोटी रुपयांचे घर गिफ्ट केले आहे.

आणखी वाचा – Video : असा पार पडला अनंत-राधिका यांचा ‘शुभ आशीर्वाद’ सोहळा, ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याने केलं होस्टिंग, खास लुकनेही वेधलं लक्ष

याबद्दल एका मराठी अभिनेत्याने अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्यावर मार्मिक पोस्ट लिहिली आहे. ‘बिग बॉस मराठी’ फेम जय दुधाणे त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या बातमीचा स्क्रीनशॉट पोस्ट करत “खूप गरीब असल्यासारखं वाटत आहे” असं म्हटलं आहे. जय दुधाणेची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जयच्या या पोस्टने पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आणखी वाचा – कुंभ, धनू, मकर व मीन राशीच्या लोकांना मंगळवारी होणार धनलाभ, व्यवसायात नवीन संधी मिळणार, जाणून घ्या…  

दरम्यान, अनंत-राधिका यांच्या लग्नामध्ये झालेल्या खर्चावर अनेक कलाकार त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. सौरभ गोखले या अभिनेत्यानेदेखील अनंत-राधिका यांच्या लग्नाबद्दल अनेक मार्मिक पोस्ट शेअर केल्या असून त्यांच्या पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Tags: bigg boss marathi fameJaved Jaffrey Son Ambani Housejay dudhanemarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Martyr Surendra Moga Daughter
Social

वडिलांचा शेवटचा फोन, सुरक्षित आहे बोलले अन्…; शहीद सुरेंद्र मोगा यांच्या लेकीचा आक्रोश, म्हणाली, “बदला घेईन”

मे 12, 2025 | 4:23 pm
Rakesh Poojary Death
Entertainment

अवघ्या तिशीत सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, मित्राच्या मेहंदीमध्ये नाचला, मित्रांसह मस्करी केली अन्…

मे 12, 2025 | 4:05 pm
Vaama Ladhai Sanmanachi
Entertainment

मराठीत ‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपटाची चर्चा, स्त्रियांचा संघर्ष अधोरेखित करणारं कैलास खैर यांच्या आवाजातील गाणं प्रदर्शित

मे 12, 2025 | 3:39 pm
bharti singh family in Amritsar
Entertainment

भारत-पाकिस्तान तणावात अमृतसरमध्ये भारती सिंहचं कुटुंब, स्वतः थायलंडला जाताच ट्रोल, खूप रडली अन्…

मे 12, 2025 | 2:05 pm
Next Post
Hina Khan started her work after fighting breast cancer and she has also shared a special video about it.

Video : तू चाल पुढं! कॅन्सरशी झुंज देता देता हिना खानची कामाला सुरुवात, व्हिडीओद्वारे दाखवली स्वत:ची अवस्था, म्हणाली, “चांगल्या दिवसांची वाट...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.