शुक्रवार, मार्च 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “तूच घात केला”, बहीण म्हणत मागे मागे फिरणारा छोटा पुढारी व निक्कीमध्ये मोठा वाद, म्हणाली, “तू फेक…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 19, 2024 | 8:57 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi Season 5

'बिग बॉस मराठी'च्या घरात निक्की तांबोळी आणि छोटा पुढारीच बिनसलं, चूक कोणाची?

Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहे. यंदाच्या या पर्वात स्पर्धक मंडळी धुमाकूळ घालताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी’चा हा शो भावनांचा खेळ आहे. या भावनांच्या खेळात चौथा आठवडा सुरु झाला असून सदस्यांचे खरे रंग दिसायला सुरुवात झाली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सदस्यांनी तिन आठवड्यातच नाती निर्माण केलेली दिसली. काहींनी या घरात मैत्रीचं नातं बनवलं, तर काहींनी प्रेमाचे बंध आणत प्रेमाची नाती बनविली तर काहींनी बहीण भावाचं नातं बनवलेलं दिसलं. या पर्वातील चर्चेत असलेली बहीण भावाची जोडी म्हणजे निक्की तांबोळी व घनःश्याम दरवडे.

छोटा पुढारी व निक्कीमध्ये बहिण-भावाचं नातं निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे. पण आज रक्षाबंधनाच्या दिवशीच या भावा बहिणीच्या नात्यात फूट पडलेली पाहायला मिळणार आहे. निक्की व छोटा पुढारीमध्ये मोठा वाद झाला असल्याचं समोर आलं आहे. या प्रोमोमध्ये निक्की घन:श्यामला म्हणत आहे, “तू फेक आहेस”. त्यावर घन:श्याम तिला विचारतो, “काय फेक वागलोय ते तर सांग.. तू किती आपली आहेस हे अख्ख्या जनतेला दिसतंय. मी तुला सख्ख्या बहिणीचा दर्जा दिला होता. यावर निक्की म्हणते, “नको देऊ”. त्यावर घन:श्याम म्हणतो, “निक्की ताई बोलल्यामुळेच घात झालाय ना”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरातून निखिल दामलेपाठोपाठ योगिता चव्हाणही घराबाहेर, सदस्यांना अश्रू अनावर

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

निक्की तांबोळी आणि छोटा पुढारी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. आम्ही दोघे बहीण -भाऊ म्हणत छोट्या पुढारीने निक्कीसह मैत्री केली. पण दोघांच्या पप्पी व झप्पीमुळे प्रेक्षकांनी त्यांची खिल्ली उडवली. आता ऐन रक्षाबंधनच्या दिवशीच त्यांच्यात मोठा वाद झालेला पाहायला मिळाल्याने त्यांच्यात वाद झाल्याचं दिसत आहे. छोटा पुढारीने टीम एमध्ये जाणं पसंत केलं. निक्की, अरबाज, वैभव यांमध्ये छोटा पुढारी चांगलाच रुळला.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi मधील निखिल दामलेचा प्रवास संपला, नेमकं काय चुकलं?

सुरुवातीला निक्कीच्या अरबाज बरोबरच्या तिच्या वागणुकीमुळे त्यांच्यात प्रेमाचे बंध फुलताना पाहायला मिळाले. मात्र अरबाज बरोबर खटकल्यानंतर आता निक्कीने घनःश्याम बरोबर मैत्री केली असल्याचे पाहायला मिळालं होतं. निक्की व घनश्याम हे एकत्रच असायचे आणि बरेचदा ते एकत्र वेळही घालवताना दिसले आहेत. आता मात्र या दोघांमध्ये फाटाफूट झालेली पाहायला मिळत आहे.

Tags: bigg boss marathibigg boss marathi season 5nikki tamboli and ghashyam daravade
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

anurag dobhal brother instagram
Entertainment

अनुराग डोभालचे आरोप खोटे, भावाने पुराव्यांसह समोर आणलं सत्य, पत्नीला मारहाण आणि…

मार्च 6, 2026 | 12:45 pm
Simran Khedkar Mother
Entertainment

आठ वर्षांपासून सिंगल पॅरेंट, १२वी नापास आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईने ४३व्या वर्षी घेतलं स्वतःच घर, म्हणाली..

मार्च 6, 2026 | 12:15 pm
Apurva Gore Wedding Rituals Begins
Entertainment

मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीची लगीनघाई, ४० वर्ष जुनी आईची साडी नेसली आणि… ; ग्रहमखचे फोटो समोर

मार्च 6, 2026 | 11:19 am
Thalapathy Vijay dating Trisha Krishnan
Entertainment

थलापती विजयच्या अफेअरच्या चर्चा खऱ्या, गर्लफ्रेंडसह एकत्र स्पॉट झाला आणि…; पत्नीचे आरोप ठरले खरे

मार्च 6, 2026 | 10:35 am
Next Post
Paaru Marathi Serial todays episode

Paaru Marathi Serial : किर्लोस्कर कंपनीचा खरा चेहरा कोण होणार?, दिशा-पारूमध्ये स्पर्धा, अहिल्यादेवी योग्य तो न्याय देतील का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.