Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाची सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. अल्पावधीतच ही कलाकार मंडळी स्वतःला सिद्ध करण्यासाठी लढताना दिसत आहेत. सध्या ‘बिग बॉस’च्या घरात कॅप्टन्सी टास्कदरम्यान स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. यंदाच्या पर्वात सहभागी झालेल्या अभिनेत्री योगिता चव्हाणच्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. कॅप्टन्सी टास्कदरम्यान योगिताने सह स्पर्धकांना आपला जलवा दाखवत उत्तम खेळ खेळला आहे. टीम बी मध्ये योगिता असून ती तिच्या टीमसाठी वा कॅप्टन होण्यासाठी लढा देताना दिसत आहे.
योगिताचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास सुरु झाला तेव्हा ती अगदी शांत होती. समोरच्यांची ओळख पटेपर्यंत योगिताने तोंडातून चकार शब्द काढला नाही. विशेष म्हणजे टास्क दरम्यान योगिता उत्तम खेळताना दिसली. आता पुन्हा एकदा योगिताने टास्कमध्ये उत्तम खेळत स्पर्धकांना इंगा दाखवला आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की कॅप्टन्सी टास्कदरम्यान निक्की, जान्हवी यांनी योगिताला खाली पाडलं आणि तिला खेचलं. हे योगिताला सहन झालं नाही शेवटी योगिताने तिचा इंगा दाखवत निक्की व जान्हवी यांच्यावर पलटवार केला.
हा धाकड गर्लचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. योगिता निक्की व जान्हवीला पुरुन उरलेली दिसत आहे. हा प्रोमो पाहून आता योगिताच्या नवऱ्याने म्हणजेच अभिनेता सौरभ चौघुलेने कमेंट केलेली पाहायला मिळत आहे. सौरभने या प्रोमोखाली कमेंट करत, “चला आता वाट मोकळी करा”, असं म्हटलं आहे. योगिताने उत्तम खेळावं असं सौरभला मनापासून वाटत आहे, याबाबत सौरभने इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. दरम्यान, इकडे योगिताला ‘बिग बॉस’च्या घरात मानसिक त्रास होतं आहे. इथे रहायचं नसल्याचं तिने स्पष्ट सांगितलं आहे. असं असलं तरी ती उत्तम खेळ खेळताना दिसत आहे.

“योगिता खूप छान खेळत आहात, तुम्हाला बाहेर यायचं आहे हे जाहीरपणे सांगायला नको होते. तुमच्यासारख्या हळव्या मनाच्या मुलीला खोट्या वागणाऱ्या, नौटंकी लोकांमध्ये त्रास झाला असेल पण तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. तुम्हाला खरोखरच पुन्हा एकदा घरात राहावे वाटले तर नक्कीच जाहीरपणे सांगा जनता तुम्हाला सेफ करेल”, अशी कमेंट ‘बिग बॉस’ फेम तृप्ती देसाई यांनी केली आहे. तर अभिनेत्री साक्षी गांधी हिनेदेखील कमेंट करत योगिताचं कौतुक केलं आहे.