शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“दादांनी माझ्या घराचे काम सुरु केले आणि…”, अजित पवारांना भेटायला मुंबईत आला सूरज चव्हाण, म्हणाला, “देवमाणूस…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 9, 2024 | 1:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 winner Suraj Chavan met newly elected Deputy Chief Minister Ajit Pawar and congratulat him

सूरज चव्हाणने नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेतली भेट, देवमाणूस म्हणत केलं कौतुक

‘बिग बॉस मराठी’चे ५ चे पर्व ऑक्टोबर महिन्यात संपलं असलं तरी या सीझनमधील स्पर्धकांची आजही चर्चा होत असते. या पर्वातील अनेक स्पर्धक या ना त्या कारणाने चर्चेत राहत असतात. ‘बिग बॉस’ जिंकल्यानंतरही त्याचा  साधेपणा प्रेक्षकांना भावतो आहे. मूळचा बारामतीचा असलेल्या सूरजने ‘बिग बॉस’ जिंकल्यानंतर अजित पवार यांची भेट घेतली होती. विधानसभा निवडणुकींचा निकाल लागून महायुतीचा दणदणीत विजय झाला आणि अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री बनले. त्यांच्या विजयाबद्दल शुभेच्छा देण्यासाठी  आणि त्यांचं अभिनंदन करण्यसाठी सूरज चव्हाणे पुन्हा त्यांची भेट घेतली. (Suraj Chavan wished Ajit Pawar)

सूरज चव्हाण हा थेट अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचला, त्याने त्यांच्यासाठी खास भेटही आणली होती. दोघांमध्ये काही वेळा गप्पा रंगल्या. यावेळी अजित पवार यांनी सूरजच्या घरासंदर्भातही अपडेट घेतली आणि पुढील नऊ महिन्यात सूरज याचं घर पूर्ण होईल असं आश्वासन देखील यावेळी अजित पवार यांनी सूरजला दिलं. त्यांच्या या भेटीवेळी सूरज खूप आनंदी दिसला. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सूरजने यावर भाष्य केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Suraj Chavan (@official_suraj_chavan1151)

आणखी वाचा – भारतात परतल्यानंतर ममता कुलकर्णीची गौतम बुद्धांच्या प्रवासाशी तुलना, म्हणाली, “माझ्या आध्यात्मिक मार्गावर…”

यावेळी सूरज असं म्हणाला की, “दादांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मला त्यांना भेटायचं होतं. त्यांना कधी भेटतोय असं झालं होतं. माझ्या घराचेही काम आता सुरु झाले आहे. काम जोरात सुरु आहे. दादा जे बोलतात ते करतातच. देवमाणूस आहेत दादा. नऊ महिन्यांत घर पूर्ण करणार असं दादांनी म्हटलं होतं. दादांचा शब्द आहे तो आणि ते आपला शब्द पूर्ण करणारच. त्यांना आज भेटायचे खास कारण म्हणजे त्यांना मला शुभेच्छा द्यायच्या होत्या”.

आणखी वाचा – अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ने मोडले ‘गदर’ अन् ‘बाहुबली’चे सर्व रेकॉर्ड्स, चार दिवसांत कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

दरम्यान, आता ‘बिग बॉस’ नंतर सूरज पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम व युट्युब अकाउंटवरुन व्हिडीओ शेअर करायला सुरुवात केली आहे. सूरजबद्दल अजून एक बोलायचं म्हणजे लवकरच तो त्याच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करणार आहे. आपलं स्वतःच हक्काचं घर असावं असं सूरज ‘बिग बॉस’च्या घरातही बोलताना दिसला. काही दिवसांपूर्वीच सूरजच्या घराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.

Tags: ajit pawarSuraj Chavansuraj chavan meet ajit pawarSuraj Chavan wished Ajit Pawar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Marathi actress Mrinal Kulkarni praised her daughter-in-law Shivani Rangole's said that her daughter

"मला तिच्या रुपात मुलगीच झाली अन्…", मृणाल कुलकर्णींनी सांगितलं सूनेबरोबरचं नातं, म्हणाल्या, "देवाने थेट…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.