रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कुणाची मनं दुखावली असतील तर…”, सूरज चव्हाणने मागितली माफी, जान्हवी-अंकिता यांचा उल्लेख करत म्हणाला, “यापुढे मी स्वतः …”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 11, 2024 | 10:34 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi 5 winner Suraj Chavan mentioned Ankita Walawalkar and Janhavi and apologized to everyone saying that there was a problem with his Instagram.

सूरज चव्हाणने अंकिता व जान्हवी यांचा उल्लेख करत इन्स्टाग्रामचा प्रॉब्लेम झाल्याचे सांगत मागितली माफी, शेअर केली खास पोस्ट

सध्या ‘बिग बॉस मराठी ५’च्या स्पर्धकांची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या ५व्या पर्वाचे विजेतेपद पटकावल्यानंतर सूरज चव्हाण सर्वत्र लोकप्रिय झाला आहे. सोशल मीडियावर सूरजची आधी हवा होतीच मात्र ‘बिग बॉस’ जिंकल्यानंतर त्याची सोशल मीडियावरील क्रेझ आणखीणच वाढली आहे. ‘बिग बॉस’चे अनेक स्पर्धक सूरज चव्हाणची भेट घेण्यासाठी त्याच्या गावी जात आहेत. त्या सगळ्यांबरोबरचे फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. मात्र सूरज चव्हाणच्या इन्स्टाग्रामवरून त्याचे काही फोटो डिलीट झाले आहेत. सूरज चव्हाणने स्वतः ही माहिती दिली आहे. (Suraj Chavan Apology)

सूरज चव्हाणच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्याच्या काही महत्त्वाच्या पोस्ट डिलीट झाल्या आहेत. सूरजने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. डिलीट झालेल्या पोस्टमध्ये अंकिता वालावलकर आणि जान्हवी किल्लेकर यांच्याबरोबरच्याही काही पोस्ट असल्याचे सूरजने सांगितले आहे. सूरजने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “नमस्कार मी आपल्या सर्वांचा महाराष्ट्राचा लाडका सुरज चव्हाण. माझ्या इन्स्टाग्राम अकाउंटचा काही प्रॉब्लेम झाला असल्यामुळे काही खूप महत्त्वाच्या पोस्ट्स डिलीट झाल्या आहेत. त्यामध्ये माझ्या अंकिता ताई आणि जान्हवी ताईच्या पण पोस्ट होत्या. यापुढे मी स्वतः लक्ष देईल आणि काळजी घेईल. तरीही आपणा कुणाचे मन दुखावले असतील तर मोठ्या मनाने मला माफ करा”

आणखी वाचा – “यापुढे माझ्याकडून अपेक्षा नसाव्यात”, सूरजच्या ‘त्या’ वागणुकीमुळे ‘कोकण हार्टेड गर्ल’ नाराज, म्हणाली, “काढता पाय…”

दिवाळीनिमित्त ‘बिग बॉस’च्या घरातील धनंजय पोवार, वैभव चव्हाण, इरिना, जान्हवी किल्लेकर, ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता प्रभू वालावलकर यांनी सूरजची भेट घेतली होती. याचे काही फोटो व व्हिडीओ सूरजच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आले होते. जान्हवीने सूरजच्या गावी जात ट्रॅक्टर चालवला होता, तसंच ती त्याच्या शेतातही गेली होती, अंकितानेदेखील त्याच्या कुटुंबियांसह शेतात जेवण केले होते. त्याचाबरोबर डीपी, वैभव व इरीना यांनीही सूरजबरोबरचे फोटो पोस्ट केले होते. मात्र आता ही फोटो व व्हिडीओ सूरजच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिसत नाहीयेत.

आणखी वाचा – 11 November Horoscope : सोमवारचा दिवस मेष, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी फायद्याचा, इतरांच्या नशिबात नेमकं काय? जाणून घ्या…

सूरज अशिक्षित असल्यामुळे त्याला सोशल मीडियाचे फारसे ज्ञान नाही. त्यामुळे त्याचे सोशल मीडिया अकाऊंट त्याचे काही जवळचे मित्र सांभाळतात. त्यामुळे आता या सर्व पोस्ट डिलीट कशा झाल्या याचे कारण अद्याप कळलेलं नाही. पण सूरजकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. दरम्यान, सूरजच्या सोशल मीडियाद्वारे याआधीही अशी फसवणुकीची घटना घडली होती. त्याच्या नावाने काही जणांनी पैसे उकळण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरदेखील सूरजने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती.   

Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi fame actor Aroh Welankar shared a post on social media and appealed for help for his friend's little daughter.

मित्राच्या मुलीचा जीव धोक्यात, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने केलं मदतीचं आवाहन, पोस्ट व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.