मंगळवार, मे 20, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi चे विजेतेपद जिंकल्यानंतर सूरज चव्हाणच्या ‘राजा राणी’ चित्रपटाचा ट्रेलर समोर, गोलीगत पॅटर्नने घातलाय धुमाकूळ

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 9, 2024 | 5:14 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Suraj chavan new movie

गोलीगत सूरज चव्हाणच्या 'राजा राणी' चित्रपटाचा ट्रेलर समोर

सध्या सर्वत्र ‘बिग बॉस मराठी’ची हवा सुरु आहे. यंदाच्या ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स सूरज चव्हाणने नाव कोरलं. ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ या पर्वाचे विजेतेपद मिळवल्यानंतर सूरजचं भरभरुन कौतुक करण्यात आलं. ‘बिग बॉस’ची ट्रॉफी घेऊन आता सूरज त्याच्या गावी बारामतीत परतला आहे. सूरज ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीसह त्याच्या मोडवे गावातील आई मरिमातेच्या चरणी नतमस्तक झाला आहे. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडत विजेतेपद जिंकल्यानंतर आता सूरजचा नवा चित्रपट येणार असल्याचं समोर आलं आहे. (Suraj chavan new movie)

बऱ्याच दिवसांपासून ‘राजा राणी’ या चित्रपटाची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. या चित्रपटात सूरज महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. छोट्याशा खेडेगावातून आलेल्या सूरजने झगमगाटीच्या दुनियेत प्रवेश करत उत्तम यश मिळवले. छोटा पडदा गाजवल्यानंतर आता सूरज येत्या १८ ऑक्टोबरपासून मोठा पडदा गाजवायलाही सज्ज होणार आहे. सत्य घटनेवर आधारित उलगडणार्‍या ‘राजा राणी’ या प्रेम कथेतून तो महत्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात मुख्य कलाकाराच्या दोस्ताच्या भूमिकेत सूरजला पाहणं फारच रंजक ठरणार आहे.

आणखी वाचा – मदत करणार असं कॅमेरासमोरच का सांगितलं?, सूरजवरुन निक्की तांबोळीचा अंकिताला टोला, म्हणाली, “फक्त सहानुभूतीसाठी…”

View this post on Instagram

A post shared by Suraj Chavan (@official_suraj_chavan1151)

ट्रेलरमध्येही नायक नायिकेच्या प्रेमाला एकत्र आणण्यासाठी सूरज महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतोय. ट्रेलरमध्येही त्याचा गोलीगत पॅटर्न पाहणं रंजक ठरतंय. सूरजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन ट्रेलर शेअर करत, “भावांनो नमस्कार, मला सांगायला आनंद होत आहे की, मी तुमच्या आशीर्वादाने ‘बिग बॉस’ विजेता झालो. आता माझा खूप आवडता येत्या १८ ऑक्टोबर २०२४ पासून ‘राजाराणी’ नावाचा भारी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. जसा ‘बिग बॉस’ला सपोर्ट केला तसा माझ्या ‘राजाराणी’ चित्रपटाला सुद्धा सुपरहिट करा ही विनंती”, असं म्हणत त्याने प्रेक्षकांना विनंती केली आहे.

आणखी वाचा – Video : मोठे बॅनर, डीजे, डेकोरेशन आणि…; डीपीचं कोल्हापुरात स्वागत करण्यासाठी वडिलांची जय्यत तयारी, स्वत: करत आहेत काम

चित्रपटात प्रमुख भूमिकेत रोहन पाटील, वैष्णवी शिंदे ही जोडी दिसणार असून या चित्रपटात भारत गणेशपुरे, सुरेश विश्वकर्मा, सूरज चव्हाण, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण, शिवाजी दोलताडे, तानाजी गलगुंडे या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘सोनाई फिल्म क्रिएशन’ प्रस्तुत ‘राजाराणी’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केलं आहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी दोलताडे यांनी सांभाळली आहे. संगीत दिग्दर्शन पी. शंकरम, पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे, गायक आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, अनविसा दत्तगुप्ता, नागेश मोरवेकर हे आहेत. तर छायांकन कृष्णा नायकर, एम. बी. अलीकट्टी यांनी केले आहे. सूरजचा ‘राजा राणी’ हा चित्रपट १८ ऑक्टोबरपासून जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Tags: raja rani new marathi movie trailerSuraj ChavanSuraj Chavan New Movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Sharmila Shinde Shares Experience
Entertainment

“सीनमध्ये बाळ गेलं पण…”, ‘नवरी मिळे…’मधल्या दुर्गाला खऱ्या आयुष्यात झाला शारिरीक त्रास, म्हणाली, “रडले, रागावले…”

मे 19, 2025 | 7:00 pm
achint kaur struggle for work
Entertainment

१८व्या वर्षातच लग्न, घटस्फोट, बॉयफ्रेंडचीही पाठ; आता कामासाठी वणवण फिरतेय सुप्रसिद्ध अभिनेत्री, ओळखणंही कठीण

मे 19, 2025 | 6:38 pm
worms and fungus in dairymilk Cadbury
Entertainment

कॅडबरीमध्ये अळ्या, बुरशी अन्…; साताऱ्याच्या डी-मार्टमधील धक्कादायक प्रकार, मराठी अभिनेत्रींनी शूट केला व्हिडीओ

मे 19, 2025 | 5:45 pm
Shilpa shirodkar corona positive
Entertainment

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला करोना, मुंबईत पुन्हा वाढले रुग्ण, आता परिस्थिती अशी की…

मे 19, 2025 | 4:55 pm
Next Post
Nikki Tamboli said that she would like to visit Bigg Boss Marathi 5 winner Suraj Chavan hometown.

"सूरजच्या गावी जायला आवडेल आणि...", निक्कीने व्यक्त केली इच्छा, म्हणाली, "आमचं भाऊ-बहीणीचं नातं..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.