यंदाचं ‘बिग बॉस मराठी’चं नवं पर्व अगदी दणक्यात सुरु झालं आहे. यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंगची जबाबदारी रितेश देशमुख सांभाळत आहेत. बिग बॉसच्या घरात नेते, अभिनेते यांसह रीलस्टार व कीर्तनकार सहभागी झाले आहेत. वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, सूरज चव्हाण या स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. (Bigg Boss Marathi 5 Updates)
‘बिग बॉस’चं नवं पर्व सुरु झालं तेव्हापासून स्पर्धकांमध्ये वाद होताना पाहायला मिळत आहे. प्रत्येक स्पर्धक एकमेकांशी जुळवून घेताना दिसत आहे. तर काहींनी एकमेकांच्या गोष्टी, बोलणं, वागणं खटकत आहे. तर एकीकडे ‘बिग बॉस’ यांनी स्पर्धकांना टास्कही द्यायला सुरुवात केली आहे. पहिल्याच टास्कमध्ये स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. अशातच ‘बिग बॉस’ने स्पर्धांना नवा टास्क दिला आहे. यामध्ये जिंकण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रत्येक स्पर्धक लढताना दिसत आहे.
तर यंदाच्या पहिल्या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील पाच सदस्य नॉमिनेट झाले असल्याचंही समोर आलं आहे. या स्पर्धकांमध्ये वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, अंकिता प्रभू-वालावलकर, सूरज चव्हाण आणि कोल्हापूरच्या पुरुषोत्तमदादा पाटील या सदस्यांचा समावेश आहे. आता या पाच सदस्यांमधून कोण ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेणार हे येत्या विकेंडच्या वारमध्ये सिद्ध होईल.
स्पर्धकांनी मिळून आधीपासूनचं वर्षा उसगांवकर यांना टार्गेट केलं होतं. घरावरील त्यांचा ताबा आणि दरारा साऱ्यांना खटकत आहे. तर सूरज चव्हाणला ‘बिग बॉस’ मध्ये का घेतलं असं स्पर्धकांना वाटत आहे. पुरुषोत्तम दादा पाटील यांचा घरातील वावर तितकासा दिसून आला नाही. तर योगिता व अंकिता उत्तम खेळ खेळत असून त्या सगळ्यांच्या पुढे जाऊ नये म्हणून दोघींना नॉमिनेट केलं असल्याचं म्हटलं जात आहे.