Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाची सुरुवात ही भांडणांनी सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवसापासून घरात वाद होत आहेत. निक्की तांबोळी व वर्षा उसगांवकर यांच्यात पहिल्या दिवसापासूनच टोकाची भांडणं होत असल्याचं पाहायला मिळत आहे. निक्कीने वर्षा यांच्याशी केलेली वागणूक आवडलेली नाही,. कालच्या भागांतही त्यांच्यात अनेक वाद झालेले पाहायला मिळाले. निक्की तांबोळी व वर्षा उसगांवकर यांच्यात भांडण होत असल्यामुळे व त्यांच्या भांडणातील निक्कीच्या असभ्य बोलण्यामुळे चाहत्यांचा संताप झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या नॉमिनेशन प्रक्रियेत वर्षा उसगांवकरांचा उल्लेख निक्कीने “काळ्या मनाच्या मॅम, ब्लॅक हार्टेड” असा केला होता. त्यामुळे तिचे हे शब्द वर्षा उसगांवकर, त्यांचे अनेक चाहते व काही मराठी कलाकारांनाही आवडलेलं नाही. (Bigg Boss Marathi 5 Pushkar Jog on varsha usgaonaka)
यावर समाजमाध्यमांमधून कलाकार आपला रोष व्यक्त करत आहेत. अशातच ‘बिग बॉस’च्या पहिल्या पर्वाचा उपविजेता व अभिनेता पुष्कर जोगने यासंदर्भात पोस्ट शेअर करत निक्कीबद्दल संताप व्यक्त केला आहे. पुष्कर हा नेहमीच त्याला खटकणाऱ्या गोष्टींबद्दल आपली परखड मतं व्यक्त करत होतो. अशातच निक्कीने वर्षां उसगांवकरांबरोबर केलेली वागणूक पुष्करला अजिबात पटलेली नाही. याचबद्दल त्याने पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये पुष्कर म्हणतो, “निक्की तुला मॅनर्स कळतात का? मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्रीला असं अपमानित होताना पाहून खरंच खूप वाईट वाटतं. हे अत्यंत खेदजनक आहे. वर्षा उसगांवकर मॅमना अशा पद्धतीने वागवणं चुकीचं आहे. हा खेळ खेळायची एक विशिष्ट पद्धत आहे आणि हा गेम खेळताना आपण आपली मर्यादा सोडून चालत नाही. वर्षा मॅम मी तुमच्याबरोबर आहे.” तसेच या पोस्टसह त्याने ‘बिग बॉस मराठी’ व ‘कलर्स मराठी वाहिनी’ यांना टॅगदेखील केलं आहे.
दरम्यान, या आठवड्याच्या शेवटी रितेश देशमुख निक्कीच्या या वागण्याबद्दल काय मत व्यक्त करणार? निक्कीला रितेश देशमुखांकडून खडेबोल सुनावले जाणार का? कलाकार व चाहत्यांच्या अपेक्षांना रितेश देशमुख खरं ठरवणार का? हे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आगामी भागांसाठी प्रेक्षक व चाहते खूपच आतुर आहेत.