शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “मर्यादा सोडून चालत नाही आणि…”, वर्षा उसगांवकरांच्या पाठिशी सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, म्हणाला, “खूप वाईट आहे की…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 2, 2024 | 12:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi : "मर्यादा सोडून चालत नाही आणि…", वर्षा उसगांवकरांच्या पाठिशी सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, म्हणाला, "खूप वाईट आहे की…"

‘बिग बॉस मराठी’मधील वर्षा उसगावकरांबरोबर होणाऱ्या वागणुकीबद्दल पुष्कर जोगची पोस्ट

Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाची सुरुवात ही भांडणांनी सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवसापासून घरात वाद होत आहेत.  निक्की तांबोळी व वर्षा उसगांवकर यांच्यात पहिल्या दिवसापासूनच टोकाची भांडणं होत असल्याचं पाहायला मिळत आहे. निक्कीने वर्षा यांच्याशी केलेली वागणूक आवडलेली नाही,. कालच्या भागांतही त्यांच्यात अनेक वाद झालेले पाहायला मिळाले. निक्की तांबोळी व वर्षा उसगांवकर यांच्यात भांडण होत असल्यामुळे व त्यांच्या भांडणातील निक्कीच्या असभ्य बोलण्यामुळे चाहत्यांचा संताप झाला आहे.  नुकत्याच पार पडलेल्या नॉमिनेशन प्रक्रियेत वर्षा उसगांवकरांचा उल्लेख निक्कीने “काळ्या मनाच्या मॅम, ब्लॅक हार्टेड” असा केला होता. त्यामुळे तिचे हे शब्द वर्षा उसगांवकर, त्यांचे अनेक चाहते व काही मराठी कलाकारांनाही आवडलेलं नाही. (Bigg Boss Marathi 5 Pushkar Jog on varsha usgaonaka)

यावर समाजमाध्यमांमधून कलाकार आपला रोष व्यक्त करत आहेत. अशातच ‘बिग बॉस’च्या पहिल्या पर्वाचा उपविजेता व अभिनेता पुष्कर जोगने यासंदर्भात पोस्ट शेअर करत निक्कीबद्दल संताप व्यक्त केला आहे. पुष्कर हा नेहमीच त्याला खटकणाऱ्या गोष्टींबद्दल आपली परखड मतं व्यक्त करत होतो. अशातच निक्कीने वर्षां उसगांवकरांबरोबर केलेली वागणूक पुष्करला अजिबात पटलेली नाही. याचबद्दल त्याने पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : वर्षा उसगांवकरांनंतर निक्की तांबोळीचा आर्यावर निशाणा, नको नको ते बोलली, अरबाज-वैभव यांच्याबरोबरही वाद

या पोस्टमध्ये पुष्कर म्हणतो, “निक्की तुला मॅनर्स कळतात का? मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्रीला असं अपमानित होताना पाहून खरंच खूप वाईट वाटतं. हे अत्यंत खेदजनक आहे. वर्षा उसगांवकर मॅमना अशा पद्धतीने वागवणं चुकीचं आहे. हा खेळ खेळायची एक विशिष्ट पद्धत आहे आणि हा गेम खेळताना आपण आपली मर्यादा सोडून चालत नाही. वर्षा मॅम मी तुमच्याबरोबर आहे.” तसेच या पोस्टसह त्याने ‘बिग बॉस मराठी’ व ‘कलर्स मराठी वाहिनी’ यांना टॅगदेखील केलं आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : वर्षा उसगांवकरांवर निक्कीची दादागिरी सुरुच, ठरवून टार्गेट करण्याचा प्रयत्न?, रितेश देशमुख तरी बाजू घेणार का?

दरम्यान, या आठवड्याच्या शेवटी रितेश देशमुख निक्कीच्या या वागण्याबद्दल काय मत व्यक्त करणार? निक्कीला रितेश  देशमुखांकडून खडेबोल सुनावले जाणार का? कलाकार व चाहत्यांच्या अपेक्षांना रितेश देशमुख खरं ठरवणार का? हे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आगामी भागांसाठी प्रेक्षक व चाहते खूपच आतुर आहेत.   

Tags: bigg boss marathi 5Bigg Boss Marathi 5 Newsvarsha usgaonkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Next Post
paaru serial new promo viral

Paaru Marathi Serial : आदित्य मरणाच्या दारात, पारू व अहिल्यादेवींची त्याला वाचवण्यासाठी अग्निपरीक्षा, मंगळसूत्रही काढून ठेवलं अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.