Bigg Boss Marathi 5 Update : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ च्या भागात एकामागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहे. यंदाच्या सीझनमध्ये स्पर्धकांमध्ये प्रेमाचे वारे वाहताना पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला निक्की व अरबाज यांमध्ये प्रेमाचे वारे वाहताना पाहायला मिळाले. त्यांनंतर अचानक वैभव व इरिना यांच्यात प्रेमाचे बंध फुलताना दिसले. मराठमोळ्या मातीतील रांगडा गडी वैभव चव्हाण परदेशी गर्ल इरिना रुडाकोवाच्या प्रेमात पडला. ‘बिग बॉस’च्या घरात दोघंही एकत्र वेळ घालवताना दिसले.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये वैभव चव्हाण इरिनाचं वारंवार कौतुक करताना आणि तिला जास्त महत्त्व देताना दिसला. प्रोमोमध्ये वैभव चव्हाण इरिनाला म्हणताना दिसला की,”कालपेक्षा जास्त सुंदर दिसतेस. मला तू जास्त महत्त्वाची व्यक्ती असल्याचं फिल होतंय”. त्यावर इरिनाने ‘हो’ असं उत्तरही दिलं. दोघांमधील हे प्रेम रॅपर आर्याला पाहवेना झालं. कारण रॅपर आर्यानेही वैभववरील प्रेमाची कबुली दिली. वैभवला इरिनाबरोबर वेळ घालवताना पाहून आर्या ढसाढसा रडू लागली.
आणखी वाचा – प्रिन्स नरुलाच्या बायकोचं हटके बेबी शॉवर, अभिनेत्याने बेबी बम्पला किस केलं अन्…; Inside Video व्हायरल
अशातच आता पुन्हा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. या समोर आलेल्या प्रोमोमध्ये वैभव व इरिना यांच्यातील सुंदर असा बॉण्ड पाहायला मिळत आहे. वैभव इरिनाला विचारतो, “आता तू हे माझ्यासाठी बनवत आहेस. मला खूप महत्त्व दिल्यामुळे छान वाटत आहे”. यावर इरिना, “हो”, असं उत्तर देते. यावर जान्हवी म्हणते, “तू आहेच की एवढा छान. तर निक्की म्हणते, “हा काय नवीन प्रकार सुरु आहे”. यावर इरिना व वैभव दोघेही हसतात. वैभव गमतीत म्हणतो, “अरे माझी उंची बघ तिची बघ”.
त्यांनतर इरिना वैभवला तिने हा पदार्थ नेमका कसा बनवला याबाबत सांगत असते. वैभवही हा पदार्थ नेमका कसा बनला याबाबत तिच्याकडून जाणून घेत असतो. बारामतीचा रांगडा गडी अभिनेता वैभव चव्हाण आणि परदेसी गर्ल इरिना रूडाकोवा यांच्यात खरंच प्रेम फुलतंय की नाटक आहे हे जाणून घेणं येणाऱ्या भागांमध्ये रंजक ठरेल.