शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “उद्याही तूच विजेता राहशील”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा सूरजला फुल्ल सपोर्ट, म्हणाला, “माझ्या प्रार्थना…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 5, 2024 | 10:46 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan actor Utkarsh Shinde supported by sharing a special post.

Bigg Boss Marathi 5 मधील सूरज चव्हाणला गायक, संगीतकार व अभिनेता उत्कर्ष शिंदेने खास पोस्ट शेर करत पाठिंबा दिला आहे

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा यंदाचा पाचवा सीझन खूपच गाजला. या सीझनमध्ये नेते, अभिनेते, यांसह कीर्तनकार व सोशल मीडिया स्टार्सनेदेखील स्हभाग घेतला होता. एकूण १६ स्पर्धकांपासून सुरु झालेला ‘बिग बॉस मराठी ५’ चा प्रवास आता अवघ्या ६ जणांवर येऊन ठेपला आहे. ‘बिग बॉस मराठी’ला यंदाचे टॉप ६ स्पर्धक मिळाले आहेत. अंकिता, जान्हवी, निक्की, डीपी, अभिजीत आणि सूरज. या सर्व स्पर्धकांची पहिल्या दिवसापासूनच चर्चा रंगली होती. मात्र यापैकी सूरज चव्हाणची चर्चा जरा अधिकच होती. असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. (Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan)

सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत असणाऱ्या सूरज चव्हाणने प्रेक्षकांना विशेष स्टाईलने प्रेक्षकांना आपलेसे केले आणि तो आता महाअंतिम सोहळ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. सोशल मीडियावर तर त्याच्या विजेता होण्याच्या अनेक चर्चा पाहायला मिळत आहेत. अनेकजण त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहेत. या पाठिंबा देणाऱ्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे उत्कर्ष शिंदे. गायक, संगीतकार, अभिनेता उत्कर्ष शिंदे सूरजला अगदी पहिल्या दिवसापासूनच पाठिंबा देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी मकर व मीन राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा, इतरांच्या नशिबात काय, जाणून घ्या…

अशातच त्याने सूरजसाठी नुकतीच एक खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “कपाळावरील रेषेमुळे नाही तर कपाळावरील घामामुळे तू कालही विजेता होतास आजही आहेस आणि उद्याही तूच विजेता राहशील… माझ्या सर्व प्रार्थना तुझ्याबरोबर आहेत”. तसंच उत्कर्षने शेअर केलेल्या पोस्टवर त्याचा सूरजबरोबरचा फोटो पाहायला मिळत आहे आणि यावर ‘विजेता’ असंही लिहिलेलं आहे.

आणखी वाचा – “तो उगाचच टोमणे मारायचा”, पॅडीबरोबरच्या बॉण्डबद्दल वर्षा उसगांवकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या, “मला टोचून बोललेलं…”

दरम्यान, सूरज चव्हाणने ‘टिक टॉक’च्या पहिल्या दहात स्थान मिळवले होते. त्याचा ‘गोलीगत’ हा डायलॉग तुफान चर्चेत असायचा. ‘बिग बॉस’च्या घरातही त्याच्या अनेक डायलॉगची चर्चा रंगली होती. सुरुवातीला त्याला ‘बिग बॉस’च्या घरात पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. त्याच्या या घरातील एन्ट्रीवर नाक मुरडणाऱ्यांची सूरजने आपल्या वागणुकीतून मनं जिंकली आहेत. त्याला गेम कळला नसला तरी त्याला माणसं कळली अशा शब्दांत अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे.

Tags: Bigg Boss Marathi 5 Suraj ChavanUtkarsh Shinde Suraj Chavan SupportUtkarsh Shinde Suraj Chavan Support News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 nikki and arbaaz troll

Bigg Boss Marathi : "हाच प्लेबॉय…", निक्की अरबाजमधील जवळीक पाहून प्रेक्षक भडकले, म्हणाले, "प्रेमाचं नाटक करत…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.