Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात सगळीच स्पर्धक मंडळी धुमाकूळ घालताना दिसत आहेत. स्पर्धकांनी ‘बिग बॉस’च्या घरात अक्षरशः राडे घातलेले दिसले. आता भाऊच्या धक्क्यावर रितेशने या स्पर्धकांची शाळाही घेतली पाहायला मिळाली. रितेश देशमुखने स्पर्धकांची चांगली शाळा घेतलेली पाहायला मिळाली. यंदाच्या भाऊच्या धक्क्यावर टीम ए ची रितेश देशमुखने चांगलीच खरडपट्टी केली आहे. अरेरावी करणाऱ्या या स्पर्धकांचा रितेश देशमुखने हिशोब घेतला आहे.
बिग बॉसच्या यंदाच्या पर्वात वैभव चव्हाण स्पर्धक म्हणून पाहायला मिळतोय. वैभव चव्हाणला ‘बिग बॉस’च्या घरातील गेम कळत नाही आणि तो अरबाज बरोबर हा गेम खेळतोय असं रितेशच म्हणणं आहे. अगदी पहिल्या आठवड्यापासून वैभव अरबाज कडून खेळत असल्याचं पाहायला मिळालं. अरबाजला वैभवला तर तो अरबाज २ या नावाने हाक देतो. यंदाच्या भाऊच्या धक्क्यावर रितेशने वैभवची चांगलीच शाळा घेतली. यावेळी बोलताना रितेश म्हणाला, “वैभव या आठवड्यात तुम्ही झलक दाखवली. अँग्री यंग मॅन दिसलात. निक्कीला दोनदा उत्तर पण दिली. सिनेमाच्या भाषेत हा ट्रेलर पण नाही त्यातील एक दोन शॉर्ट्स होते. कोणाला तुम्ही घाबरत आहात. निक्कीला की अरबाजला?.
यावर वैभव म्हणतो, “नाही सर. कोणालाच घाबरत नाही आहे”. यावर रितेश म्हणतो, “जेव्हा निक्की एरिनाला म्हणाल्या, त्यांना त्यांच्या देशातून रिजेक्ट केलं आहे. तेव्हा तुमचा आवाज कुठे होता?. तुम्हाला अरबाजकडून गेम का खेळायचा आहे. मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून अरबाज २ असं म्हणत आहे. निक्की तुम्हाला तुमच्या तोंडावर म्हणते मी माझ्या टीममध्ये एरिनाला घेणार नाही. आणि तेव्हा तुम्ही काय करता, अरबाजला निक्कीला समजवायला सांगता. निक्कीला तुम्ही राणी केलं आहे आणि तुम्ही सगळे गुलाम झाला आहात.
पुढे तो असंही म्हणाला की, “निक्कीच्या टीममधून सगळे गेले तर निक्की काय करणार. निक्की गेम खेळत आहे हे आम्हाला दिसत आहे तुम्हाला घरात राहून दिसत आहे. तुमचा निक्की समोर आवाज फुटत नाही आहे. तुमचा आवाज कुठे फुटतो तर आर्यासमोर. वाऱ्याशी वाद झाला तेव्हा तुम्ही तिला झापडवेन तुला असं म्हणालात. ही तुमची ताकद आहे. घरात असं बोलता का?, याने तुम्ही फार काही छान दिसत नाही आहात. वैभव फट्टू आहे असं लोक म्हणतील”.