शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “बायकांना हाडतुड करणारे मर्द पुरुष…”, निक्कीवर आवाज चढवून बोलला अरबाज, मराठी अभिनेता म्हणतो, “इतरांनी बोला कारण…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 20, 2024 | 1:02 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss marathi 5 Pushkar Jog angry on Arbaaz behavior with women in the house

Bigg Boss marathi 5 च्या घरात अरबाजच्या महिलांबरोबरच्या वागण्यावर भडकला अभिनेता पुष्कर जोग

Bigg Boss Marathi 5 : टेलिव्हिजनवरील सर्वात वादग्रस्त व लोकप्रिय शो म्हणून ‘बिग बॉस’चे नाव घेतले जाते. प्रेक्षक हिंदी ‘बिग बॉस’सह ‘बिग बॉस’ मराठीदेखील तितक्याच आवडीनं पाहतात. ‘बिग बॉस मराठी ५’ सुरु झाल्यापासून अनेकजण या शोच्या प्रेमात आहेत. सामान्य प्रेक्षकांसह मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळीही हा शो पाहतात आणि त्यावर आपली मतं सोशल मीडियाद्वारे व्यक्त करत असतात. हा शो रोज पाहणारे व त्यावर टिपणी करणारे अनेक कलाकार आहेत. यांमध्ये मेघा धाडे, उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे, अमृता देशमुख, किरण माने, पुष्कर जोग, सुरेखा कुडची, अनघा अतुल, विशाखा सुभेदार यांसारखे अनेक कलाकार आहेत. जे ‘बिग बॉस मराठी’बद्दल त्यांची मतं सोशल मीडियाद्वारे वीक करत असतात. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)

अशातच गेल्या भागावर मराठी अभिनेता पुष्कर जोगने त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘बिग बॉस’च्या पहिल्या पर्वाचा उपविजेता व अभिनेता पुष्कर जोगने यासंदर्भात अरबाजकया वागण्यावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये पुष्करने असं म्हटलं आहे की, “बायकांवर हाडतुड करणारे, त्यांच्यावर केकाटणारे मर्द पुरुष यांचा मी निषेध करतो. आपल्या समाजात हे सगळं सामान्य आहे असा समज आहे. पण तेच सर्वात घातक आहे. घरातल्या इतरांनी याबद्दल आपली भूमिका घ्या. प्रत्येक स्त्री आपल्या आई व बहिणीसारखी आहे”.

आणखी वाचा – “त्याचा आवाजही गेला अन्…” बायकोने सांगितली कॅन्सरमध्ये अतुल परचुरेंची कशी होती अवस्था?, म्हणाल्या, “वाईट वाटायचं आणि…”

यापुढे पुष्करने अरबाज व ‘बिग बॉस मराठी ५’चा उल्लेख करत ‘जोगबोलणारचं’ असा हॅशटॅगही वापरला आहे. तसंच यापुढे पुष्करने असं म्हटलं आहे की, “प्रिय स्पर्धक, हा शो खूप उत्तम आहे. त्यामुळे त्याला तसंच सांभाळा”. सध्या ‘बिग बॉस मराठी ५’ची चांगलीच चर्चा सुरु आहे. या घरातील स्पर्धकांना एकूण तीन आठवडे पूर्ण झाले असून या घरातून आतापर्यंत एकूण तीन स्पर्धकांनी निरोप घेतला आहे. पहिल्या आठवड्यात पुरुषोत्तमदादा पाटील त्यानंतर तिसऱ्या आठवड्यात निखिल दामले व योगिता चव्हाण यांनी घरातून निरोप घेतला.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “सूरज आपल्यावर भारी पडतोय”, अरबाज घाबरला, पॅडीचाही गेम ऑन झाल्यामुळे भिती, म्हणाला, “यांचा गेम…”

दरम्यान, गेल्या शनिवार व रविवारी ‘बिग बॉस’च्या घरात भाऊचा धक्कावर रितेशने सर्वांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्याने घरातील सर्व स्पर्धकांची शाळा घेतली असून टीम Bबद्दल एकमेकांची चुगली सांगितली आहे. तसंच यावेळी सूरज हा सर्वांवर भारी पडत असल्याचेदेखील सांगितले. त्यामुळे आता आगामी भागात प्रेक्षकांना काय काय नवीन पाहायला मिळणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.       

Tags: Arbaaz Patelbigg boss marathi 5pushkar jog
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Next Post
Jui Gadkari Health Update

'ठरलं तर मग' फेम जुई गडकरी रुग्णालयात भरती, बेडवरील फोटोही केला शेअर, म्हणाली, "नक्की काय झालं हे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.