शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “त्याला तुझी जास्त गरज आहे”, अभिजीतची बाजू घेत निक्कीचं अंकिताकडे स्पष्टीकरण, म्हणाली, “डोळ्यांत अश्रू…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 2, 2024 | 3:52 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Nikki Tamboli and Ankita Walawalkar conversation about Abhijeet Sawant see the details

Bigg Boss Marathi 5 मध्ये निक्की-अंकिता यांच्यात अभिजीतबद्दल संवाद, दुरावलेले संबंध पुन्हा जुळणार का?

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’चा शो म्हणजे अनेक ट्विस्टने भरलेला शो. बिग बॉसच्या घरात प्रत्येक दिवशी नवनवीन ट्विस्ट येत असतात. दिवसागणिक बिग बॉसच्या घरात अनेक नाती बनतात आणि अनेक नाती तुटतातही. अशातच नुकत्याच झालेल्या शनिवारी व रविवारी झालेल्या भाऊचा धक्क्यानंतर आता घरात नवीन समीकरणं तयार होणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. टास्कच्या वेळी एकमेकींना पाण्यात पाहणाऱ्या अंकिता वालावलकर आणि निक्की तांबोळी यांच्यात आजच्या भागात संवाद होताना दिसणार आहे. यामध्ये निक्की हे अभिजीतचे सत्य सांगणार आहे. एकीकडे घरात नॉमिनेशनसाठी कठीण टास्क पार पडणार आहे. तर दुसरीकडे घरातील काही सदस्य एकमेकांकडे एकमेकांबद्दलचं गॉसिप करताना दिसणार आहेत. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)

अभिजीत आर्याबद्दलचं त्याचं मत अंकिताकडे मांडताना दिसणार आहे. तर निक्कीही अंकिताला अभिजीतबद्दल सांगणार आहे. निक्की व अभिजीतच्या मैत्रीवर अंकिताने अनेकदा आक्षेप घेतले आहेत. अभिजीतने निक्कीबरोबर मैत्री करणे म्हणजे ग्रुपला धोक्यात घालण्यासारखं असल्याचे अंकिताने याआधी म्हटले. अशातच आता निक्की व अंकिता एकमेकांबरोबर अभिजीतविषयी संवाद साधणार आहेत. कलर्स मराठीने नुकत्याच शेअर केलेल्या या नवीन प्रोमोमध्ये निक्की अंकिताला म्हणते, “माझ्यापेक्षा जास्त विश्वास त्याला तुझ्यावर आहे. कारण, तुम्ही पहिल्या दिवसापासून एकमेकांबरोबर आहात. आमची मैत्री वाढली; पण त्याचं तुझ्याबरोबर असलेलं नातं हे तसंच आहे”.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – “आई आणि बाबा रिटायर होत आहेत” निवेदिता सराफांची नवी मालिका, प्रेक्षक म्हणाले, “नवीन असावरी…”

यापुढे ती असं म्हणते की, “जेव्हा एलिमिनेशनसाठी तुझं नाव घेतलं होतं. त्यावेळी तो म्हटला होता, मी संपलो आणि त्याच्या डोळ्यांत अश्रू होते. तो तुला माझ्याहून वरचा दर्जा देतो आणि त्याला तुझी गरजपण आहे. पण, तू बोलत नाही आहेस. ठीक आहे, तुझ्या डोक्यात काहीही विचार असेल. मी फक्त इथे स्पष्ट करायला आलीय की, जर त्याला तुझ्या आणि माझ्यामध्ये कोणाला निवडायचं असेल, तर तो नेहमीच तुला निवडेल”. यावेळी अंकिता निक्कीचं बोलणं शांतपणे ऐकताना दिसत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “मला अरबाजविषयी विचारणं…”, अरबाजच्या गर्लफ्रेंडचं मोठं वक्तव्य, म्हणाली, “मला मॅसेज करुन…”

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अभिजीत व अंकिता यांच्यातील मैत्रीमध्ये कुठे तरी दुरावा असल्याचे भासत आहे. त्यात अभिजीत व निक्की यांची जोडी बनल्यानंतर अभिजीत  स्वत:चं डोकं न वापरता केवळ निक्कीच्या म्हणण्याप्रमाणे वागत असल्याचेही अंकिताने सुनावले आहे. पण आता निक्कीने अंकिताशी साधलेल्या या संवादानंतर अंकिता व अभिजीत पुन्हा एकत्र येणार का? त्यांची मैत्री पूर्ववत होणार का?, की या जोडीत आता काही नवीन पाहायला मिळणार? हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.  

Tags: abhijeet sawantankita walawalkarbigg boss marathi 5nikki tamboli
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
abhishek bachchan and aishwarya rai viral video

ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चनचा घटस्फोटाच्या फक्त चर्चा की सत्य?, दोघांना एकत्र पाहिल्यानंतर घडलं असं की…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.