शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi 5 : “त्याच्या साखरपुडा झाला आहे आणि…” आईने निक्कीला सांगितले अरबाजचे सत्य, ऐकून बसला धक्का, म्हणाली. “आता सगळं संपलं अन्…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 27, 2024 | 11:28 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 new promo Nikki Tamboli ended relationship with Arbaz Patel after her mother told the truth see the details

Bigg Boss Marathi 5 मध्ये आईने अरबाजबद्दल काही गोष्टी सांगताच निक्कीने त्याच्याबरोबरोचं नातं संपवलं असल्याचे म्हटलं आहे.

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे असून येत्या ६ ऑक्टोबर रोजी या शो चा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून यंदाचा ‘बिग बॉस मराठी’चा शो अवघ्या ७० दिवसांत बंद होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत होत्या आणि अखेर या चर्चांवर स्वतः ‘बिग बॉस’नेच उत्तर देत पूर्णविराम दिला. हा शो आता अंतिम टप्प्यात आल्यामुळे नुकताच या घरात फॅमिली स्पेशल एपिसोड पार पडला. नुकत्याच झालेल्या गुरुवारच्या भागात घरात वर्षा, अभिजीत व डीपी यांच्या घरातील कुटुंबीयांनी हजेरी लावली.

आजच्या भागात उर्वरीत सदस्यांच्या कुटुंबियांची घरात एंट्री होणार आहे, यावेळी निक्कीची आईदेखील घरात येणार आहे आणि याचा एक प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कलर्स मराठीने शेअर केलेल्या या नवीन प्रोमोमध्ये निक्कीची आई तिला घरात भेटायला आली असून यावेळी ती अरबाजबद्दलच्या काही गोष्टी निक्कीला सांगणार आहे. कलर्स मराठीने शेअर केलेल्या या नवीन प्रोमोमध्ये निक्कीच्या आईने तिला अरबाजबद्दल काही गोष्टी सांगताच निक्कीने अरबाजबरोबरचं तिचं नातं संपवलं असल्याचे म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “बाबा पहिल्यांदा मुंबईत आले”, वडिलांना पाहून अंकिता भावुक, बाप-लेकीचा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ समोर

या नवीन प्रोमोमध्ये निक्कीची आई तिला असं म्हणते की, “अरबाज चुकीचा चालला आहे. त्याने असं नाही करायला पाहिजे. त्याचा साखरपुडा झालेला आहे असं म्हणतात”. यानंतर निक्की जान्हवीकडे अरबाजबद्दल असं म्हणते की, “आता या  घरात अरबाज आला  तर मी पागल होईन”. त्यानंतर निक्की असं म्हणते की, “हे अरबाज-निक्की जे होतं ना ते आता संपलं आहे”. यापुढे निक्की ‘बिग बॉस’ला अरबाजचे कपडे फेकून द्या असंही म्हणते. त्यामुळे आता निक्की-अरबाज हे नाते संपले आहे असं निक्की स्वत:चं जाहीर करते.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : “कुणी विश्वास ठेवला नाही आणि…”, अभिजीतच्या बायकोने घरात आल्यावर व्यक्त केलं दु:ख, म्हणाली, “वाईट वाटलं”

दरम्यान, या घरात निक्की व अरबाज यांच्या नात्याची बरीच चर्चा रंगली होती, भाऊच्या धक्क्यावर अरबाजने तो कमिटेड असल्याचे कबूल केल्यानंतरही त्याची निक्कीबरोबर जवळीक होती. या घरात दोघांमध्ये अनेकदा वादही झाले. पण तरीही त्यांचे खास नातेही प्रेक्षकांना पाहायला मिळाले. अरबाज बाहेर गेल्यानंतर ती  खूपच भावुक झाली होती. मात्र आता स्वत: निक्कीने हे नाते संपले असल्याचे जाहीर केलं आहे                      

Tags: bigg boss marathi 5Nikki Tamboli ended relationship with Arbaz PatelNikki Tamboli mother
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 arbaaz patel age

Bigg Boss Marathi : "दारु-सिगारेटला कधीच हात लावला नाही", अरबाज पटेलचा खुलासा, म्हणाला, "आता मला २५वं वर्ष सुरु आहे आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.