Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’च्या घरात टास्क, एलिमिनेशन यांना जितकं महत्त्व असतं तितकंच किंबहुना त्याहून अधिक जास्त महत्त्व असतं ते कॅप्टनपदाला. बिग बॉसच्या घराचा कॅप्टन होण्यासाठी प्रत्येकजण सचोटीने लढत देत असतो. याच लढतीत शुक्रवारी वर्षा उसगांवकर यांनी बाजी मारली. यंदाच्या आठवड्यात कॅप्टन होण्याचा बहुमान वर्षा उसगांवकर यांना मिळाला आहे. आता संपूर्ण आठवडाभर घराचा कार्यभार त्या सांभाळतील. तसेच कॅप्टन झाल्यामुळे त्या यंदाच्या आठवड्यात एलिमिनेशनपासून ही सुरक्षित असतील. (Bigg Boss Marathi 5 new captain)
घरात नवीन कॅप्टन निवडण्यासाठी ‘मुंज्या’ हा टास्क खेळवण्यात आला होता. यात कॅप्टनपदासाठी दावेदार असणाऱ्या सदस्यांना मुंज्यासमोर आपण कसे चांगले कॅप्टन होऊ शकतो आणि इतर सदस्यांपेक्षा आपण कसे वरचढ आहोत, यावर चर्चा करायची होती. या टास्कमध्ये शेवटी वर्षा, सूरज, अंकिता, वैभव व जान्हवी असे पाच जण राहिले होते. अंकिताने वर्षा मॅम कॅप्टन व्हायला हव्यात या डीलवर या टास्कमधून माघार होण्याचा निर्णय घेतला. तसंच सूरजददेखील या प्रक्रियेतून बाहेर पडला. पण, वैभव व जान्हवी दोघेही कॅप्टनपदासाठी आग्रही होते. मात्र या तिघांमध्ये बहुमत होत नसल्याने जे सदस्य बाद झाले होते त्यांच्यावर हा निर्णय सोपविण्यात आला.
‘बिग बॉस’ने कॅप्टनपदासाठी कोणाची निवड करायची हे ठरवण्याचा विशेष अधिकार ‘पाताळ लोक’ टास्क गमावलेल्या ‘ए’ टीमला दिला. निक्की, अरबाज, पॅडी, घन:श्याम आणि अभिजीत या पाच सदस्यांना बहुमताने जान्हवी, वैभव आणि वर्षा यांच्यापैकी एकाची कॅप्टनपदासाठी निवड करायची होती. या पाच जणांनी क्षणाचाही विलंब न करता मोठ्या आनंदाने कॅप्टनपदासाठी वर्षा उसगांवकरांचं नाव सुचवलं. वर्षा यांच्या नावाचा जयघोष करत या सदस्यांनी “हमारा नेता कैसा हो, वर्षा ताई जैसा हो…” अशा घोषणा दिल्या आणि वर्षा उसगांवकरांचे नाव कॅप्टन म्हणून घेतले.
आणखी वाचा – 31 August Horoscope : कर्क, तूळ, धनु राशीच्या लोकांना शनिवारी मिळणार शुभवार्ता, बाकीच्या लोकांसाठी दिवस कसा?
वर्षा उसगांवकरांनी जान्हवी व वैभव या दोघांसमोर स्वत:चे मुद्दे अत्यंत प्रभावीपणे मांडले. वर्षा यांनी वैभव व जान्हवीचा प्रत्येक मुद्दा खोडून काढत ‘पाताळ लोक’ टास्कमध्ये त्या कशा चांगल्या खेळल्या हे सर्वांसमोर स्पष्टपणे मांडलं. पण काही केल्याने या तिघांमध्ये बहुमत होत नव्हतं. त्यामुळे बिग बॉसने एक मोठा निर्णय घेतला आणि इथेच बाजी पलटली. त्यामुळे वर्षा उसगांवकर या घरच्या नवीन कॅप्टन झाल्या.
दरम्यान, या आठडव्यात वर्षा उसगगांववकर, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी व अभिजीत सावंत हे चार सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत आहेत. मात्र आता यांपैकी वर्षा उसगांवकर कॅप्टन झाल्यामुळे त्या घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेतून सुरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे साहजिकच त्या घराबाहेर पडणार नाहीत. आता पुढील आठवडाभर वर्षा उसगांवकरांच्या कॅप्टन्सीचे वारे घरात वाहतानाचे पाहायला मिळणार आहे