Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकतीच पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली. बॉडी बिल्डर संग्राम चौगुलेने ‘बिग बॉस मराठी’च्या वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली. संग्राम चौगुले घरात शिरताच घरातील समीकरणं बदलतील आणि नवा राडा पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री करताच दादागिरी करणारा संग्राम नंतर मात्र दिसेनासाच झाला. वाईल्ड कार्ड सदस्याला ‘बिग बॉस’चा खेळ, त्या खेळातील सदस्यांचा गेम प्लॅन या सर्व गोष्टी माहिती असतात. त्यानुसार वाइल्ड कार्ड सदस्य आपला गेम प्लॅन ठरवत असतो. पण संग्रामचा तसा गेम प्लॅन प्रेक्षकांना पाहायला मिळाला नाही. (Bigg Boss Marathi 5 Sangram Chougule)
अशातच नुकत्याच झालेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये संग्राम अरबाजविरुद्ध खेळी करेल आणि टास्क जिंकेल अशी अपेक्षा होती. पण संग्रामने अरबाजबरोबर अगोदरच केलेल्या डीलमुळे त्याने आपला गेम दाखवला नाही. तिसऱ्या फेरीमध्ये पॅडी-संग्राम आणि वर्षा-अरबाज असे स्पर्धक समोरासमोर येतात. त्यावेळी अरबाज त्याने मनाशी ठरवल्याप्रमाणे अभिजीतच्या घरट्यामध्ये अंडे टाकतो. या फेरीत संग्रामला दुखापत होते आणि याचा दोष जान्हवी-संग्राम बी टीमला देतात. पॅडी, अंकिता यांचे यावरुन जान्हवी-संग्रामशी जोरदार भांडण होते.

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील पहिला वाइल्ड कार्ड सदस्य संग्राम चौगुले टीम बीबरोबर राहून अरबाजला ताकदीमध्ये टक्कर देताना पाहण्याची इच्छा होती. पण, संग्राम दुसरा वैभव निघाल्याची प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. त्यामुळे संग्राम सोशल मीडियावर टीकेचा धनी ठरला आहे. “संग्रामला कवड़ी मात्र अक्कल नाही, फक्त शरीर आहे, मेंदू घरी ठेवलाय त्याने”, “संग्राम खूप वाईट आहे, त्याने संपूर्ण टीमचा विश्वासघात केला आहे”, “संग्राम भाऊ फुसकी बॉम्ब निघाला राव. पण पूर्ण महाराष्ट्राची निराशा झाली”, “फुसका बॉम निघाला हा”, “भित्रा वाटतोय हा संग्राम”, “काही असो संग्राम हा अरबाज ला घाबरतो”, “अरबाज ३” अशा अनेक कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी त्याच्या खेळाबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर रितेशने संग्राम चौगुलेची शाळाही घेतली. तुम्ही वाइल्ड कार्ड म्हणून नाही तर माइल्ड कार्ड आहात असं म्हणत रितेशने संग्रामचे कान टोचले. त्यानंतर संग्रामने सोमवारच्या टास्कमध्ये त्याचा थोडा खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा गुरुवारच्या भागात त्याने अरबाजला लढा दिला. मात्र यामुळे त्याच्या हाताला दुखापत झाली आहे. या कार्याअंती सूरज, डीपी, अरबाज आणि वर्षा हे सदस्य कॅप्टन पदाचे उमेदवार ठरतात.