‘बिग बॉस मराठी’च्या घरातून आर्या जाधवला घराबाहेर काढलं आहे. निक्कीवर हात उचलल्यामुळे आर्याला ‘बिग बॉस’च्या घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. कॅप्टन्सी कार्यामध्ये आर्याने संयम सोडून निक्कीवर हिंसेचा प्रयोग केला. यानंतर ‘बिग बॉस’ने घरातील नियम मोडल्यामुळे आर्याला घराबाहेर काढलं आहे. कॅप्टन्सी टास्कदरम्यान निक्की आणि आर्यामध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर आर्याने निक्कीला ‘मी तुला मारीन’ असं म्हटलं. त्यानंतर त्यांच्यातील वाद टोकाला गेला आणि आर्याने निक्कीवर हात उचलला. आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली. ‘बिग बॉस’च्या घरात निक्कीवर हात उचलून हिंसा केल्यामुळे आर्याला घराबाहेरचा रस्ता दखवण्यात आला.
आर्याला घराबाहेर काढण्यात आल्याच्या निर्णयावर अनेक चाहते मंडळी व प्रेक्षक नाराज झाले असून त्यांनी ‘बिग बॉस’ न बघण्याचा निर्णय घेतला आहे. कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी आपली मतं व्यक्त केली असून प्रत्येकाने आर्याला पाठींबा देत तिच्यावर अन्याय झाला आहे असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर देखील यांचे प्रतिसाद उमटताना दिसत आहेत. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात निक्की व कश्मिरा शाह यांचे भांडण पाहायला मिळत आहे.
‘बिग बॉस मराठी ५’च्या आधी निक्कीने हिंदी बिग बॉसमध्येही सहभाग घेतला होता आणि या शोमध्येही निक्कीचे अनेकदा घरातील स्पर्धकांबरोबर वाजले होते. कश्मिरा शाह, अर्शी खान आणि राखी सावंत एकत्र निक्की तांबोळी आणि मनू पंजाबीबद्दल बोलण्यावरुन त्यांच्यात जोरदार वादावादी झाली होती आणि यात कश्मिरा निक्कीच्या कानाखाली मारते. त्यांच्या भांडणांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर अनेकांनी आर्याच्या समर्थनार्थ कमेंट्स केल्या आहेत.
या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी “निक्कीला मारणारी आर्या ही पहिली मुलगी नाही”, “निक्की जाईल तिथे मार खाते”, “निक्कीने हिंदी आणि मराठी बिग बॉस मध्येही मार खाल्ला आहे, हिची लायकीच ही आहे”, “आता कुठे गेली निक्की ची आई शोधा आणि व्हिडीओ पाठवा तिला म्हने काय तर माझी मुलगी मार खायला नाही गेली” अशा अनेक कमेंट्स करत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.