Bigg Boss Marathi 5 : ८० च्या दशकात ग्लॅमर मिळणं खूप कठीण होतं. अनेकांना संघर्ष करुनही तो मिळाला नाही तर काहींच्या नशिबात तो समोरुन चालत आला. बॉलिवूड आणि टीव्ही जगतातील शोमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यात खूप कमी लोकांना यश मिळालं. यापैकी एक नाव म्हणजे वर्षा उसगांवकर. ८० च्या दशकात फक्त दूरदर्शन असायचं आणि त्यावरील एखाद्या शोमध्ये काम करण्याची संधी मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती याच काळात वर्षा यांनी मराठी प्रेक्षकांसह हिंदी प्रेक्षकांचेही मनोरंजन केले. चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून भेटीला येणाऱ्या वर्षा यांनी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वामध्येही सहभाग घेतला. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. (Varsha Usgaonkar Eliminated)
‘बिग बॉस मराठी’मध्ये त्यांनी अगदी सहज वावर केला. ‘बिग बॉस मराठी’मधील त्यांचा प्रवास हा खूपच रंजक होता. या घरात त्या विशेष ओळखल्या गेल्या त्या त्यांच्या सहनशक्तीमुळे. बिग बॉस मराठीच्या घरात अनेकदा त्यांना अपमानास्पद वागणूक मिळली. त्यांच्या मातृत्वावरही बोललं गेलं. पण ही परिस्थिती वर्षा अगदी सहनशक्तीने सांभाळली. या घरात त्यांचे अनेक शब्दही गाजले, विशेष म्हणजे त्यांची निक्कीबरोबरची नोकझोकही प्रेक्षकांनी एन्जॉय केली. मात्र आता या घरातील त्यांचा प्रवास संपला आहे.
आणखी वाचा – खून, पुरावे अन् स्कॅम…; Like आणि Subscribe चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित, अमेय व अमृताच्या भूमिकांचं कौतुक
‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकतंच मिड वीक एलिमिनेशन पार पडले असून यात वर्षा उसगांवकर यांना घरचा निरोप घ्यावा लागला आहे. बिग बॉस मराठीच्या घरात एकणू सात सदस्य होते. यात अंकिता, सूरज, जान्हवी, डीपी, अभिजीत आणि वर्षा यांचा समावेश होता. पण आता या घरातील वर्षा यांचा प्रवास संपला आहे. वर्षा यांच्या अचानक झालेल्या एलिमिनेशनमुळे त्यांच्या चाहत्यांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, जुलै महिन्यात ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला अगदी दणक्यात सुरुवात झाली होती. टीआरपीमध्येही हा कार्यक्रम अव्वल ठरला होता. तर नॉन-फिक्शन कार्यक्रमांमध्ये सर्वाधिक पाहिला जाणारा शो म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले गेले. अशातच आता हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. १०० दिवसांऐवजी ७० दिवसांत हा शो संपणार आहे. येत्या ०६ ऑक्टोबर रोजी या शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे.