शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आर्थिक-समाजिक समानता लोकशाही देऊ शकली नाही पण…”, सूरजबाबत मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “एका शोने त्याला…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 28, 2024 | 1:28 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 fame Suraj Chavan Actor Abhijeet Kelkar shared a special post

अभिजीत केळकरने Bigg Boss Marathi 5 मधील सूरज चव्हाण विषयी एक खास पोस्ट शेअर केली आहे

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा यंदाचा सीझन गाजतोय तो घरातील सदस्यांमुळे आणि या घरातील लक्षवेधी चेहरा म्हणजे सूरज चव्हाण. सूरजने आपल्या स्टाईलने प्रेक्षकांना चांगलच खिळवून ठेवलं आहे. त्याचा साधेपणा प्रेक्षकांना भावतो. त्याचं बिनधास्त वागणं प्रेक्षकांच्या व चाहत्यांच्या पसंतीस उतरलं. सुरुवातीपासून सूरजचा खेळ ही प्रत्येकाला आवडत आहे. त्याचप्रमाणे घरातले ज्याप्रमाणे त्याच्याशी वागत आहेत, त्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. सूरजने त्याच्या प्रत्येक छोट्या छोट्या कृतींमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आणि याचे सर्वांनीच कौतुक केलं. (Abhijeet Kelkar On Suraj Chavan)

‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वात या सोशल मीडिया स्टारला का घेतलं? असा प्रश्न विचारणारे लाखो प्रेक्षक आताच्या घडीला सूरजचे कट्टर चाहते झाले आहेत. त्याची खेळी पाहून आणि त्याचा स्वभाव पाहून अनेकजण त्याच्याबद्दल आपपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत आणि त्याला पाठींबा देत आहेत. ‘बिग बॉस’च्या खेळात एवढा पुढे जाईल असं कोणाला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. पण त्याच्या इथपर्यंतच्या प्रवासाचा सर्वांनाच आनंद आहे. सूरजच्या अनेक चाहत्यांसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनीही त्याला पाठिंबा दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Abhi Kelkar (@abhijeetkelkar21)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “शोमधून आल्यानंतर रिलेशनच संपवलं”, अरबाज खानचा युटर्न, गर्लफ्रेंडबरोबर ब्रेकअप केल्याचं भाष्य, म्हणाला, “निक्कीला आता…”

अशातच अभिनेता अभिजीत केळकरने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट मध्ये अभिजीतने सूरजविषयी असं म्हटलं आहे की, “जी संधी आणि आर्थिक-सामाजिक समानता ७५ वर्षांची आपली लोकशाही देऊ शकला नाही. ती संधी आणि समानता सूरजला सोशल मीडिया आणि एका रिअ‍ॅलिटी शोने दिली”. अभिजीतची ही सूरजची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या पोस्टला लाईक्स आणि कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – राखी सावंत पाठोपाठ अभिजीत बिचुकलेंचा Bigg Boss च्या घरात प्रवेश, एण्ट्री करताच डायलॉगबाजी, सदस्यांची खरडपट्टी काढणार

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या या आठड्यात फॅमिली स्पेशल भाग जरी सुरू असला तरीही घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी सगळेच सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता यांच्यापैकी कोण घराचा निरोप घेणार? आणि कोण या घरात टिकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे यंदाच्या भाऊच्या धक्क्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.  

Tags: abhijeet kelkarbigg boss marathi 5Suraj Chavan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
aishwarya rai on aaradhya bachchan

"मुलगी तुझ्याबरोबरच असते मग शाळेत कधी जाते?" आराध्यावरुन ऐश्वर्या रायला प्रश्न, उत्तर देत बोलतीच केली बंद, म्हणाली, "ती सतत…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.