शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सूरजच जिंकावा, बुक्कीत टेंगुळ देऊन…”, घराबाहेर आल्यानंतर इरिनाचा सूरजला फुल्ल सपोर्ट, म्हणाली, “त्याच्या गावी जाणार आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 29, 2024 | 2:19 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Irina Rudakova On Bigg Boss Marathi 5

इरिना रुडाकोवाने केलं सूरज चव्हाणबाबत मोठं विधान, मोठा खुलासा

Irina Rudakova On Bigg Boss Marathi 5 :  ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वातील स्पर्धकांची अंतिम सोहळ्यात जाण्यासाठीची धावपळ पहायला मिळत आहे. प्रत्येक स्पर्धक स्वतःला सिद्ध करताना दिसत आहे. तर भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख स्पर्धकांची चांगलीच शाळा घेताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात नॉमिनेशन प्रक्रियेत आर्या जाधव, वैभव चव्हाण, इरिना रुडाकोवा, अभिजीत सावंत हे चार स्पर्धक होते. या चार स्पर्धकांवर टांगती तलवार असताना इरिना रुडाकोवाचा प्रवास संपला. इरिनाला ‘बिग बॉस’च्या घरातून एक्झिट घ्यावी लागली.

इरिनाने अगदी पाहिल्या दिवसापासून प्रेक्षकांच्या मनात घर केलं होत. मराठी कळत असलं तरी नीट मराठी बोलता येत नव्हतं असं असलं तरी ती तिचा खेळ एकटी खेळत होती. फॉरेनर म्हणून ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केल्यानंतर इरिनाने तिच्या प्रेमळ मराठी संवादाने प्रेक्षकांची मन जिंकली. ‘बिग बॉस’च्या घरात प्रत्येक स्पर्धकासह ती मराठी भाषा नव्याने शिकताना दिसली. अंकिताने तिला मालवणी तर डीपीने तिला कोल्हापुरी भाषा शिकवली. एकूणच हा प्रवास सुरु असताना इरिना वैभव चव्हाणच्या प्रेमात पडली. इरिना व वैभवची प्यारवाली लव्हस्टोरी ‘बिग बॉस’च्या घरात पाहणं रंजक ठरलं.

आणखी वाचा – मराठी दिग्दर्शिकेच्या घरी झालेली चोरी, आरोपीला अटक झाल्यानंतर मोठा खुलासा, ड्रग्जसाठी पैसे खर्च केले अन्…

इरिनाला ‘बिग बॉस’च्या घरात कोण खरं वाटत असा प्रश्न विचारला तेव्हा उत्तर देत ती म्हणाली की, “हा खरंच खूप कठीण प्रश्न आहे. पण माझ्या डोळ्यांनी कोण खरं कोण नाही हे पाहिलं आहे. आणि आता मला या घरात सूरज खरा वाटतोय”. सूरजबरोबरचा बॉण्ड कसा आहे हा प्रश्न विचारला तेव्हा ती म्हणाली, “सूरजच्या गावी खूप प्राणी आहेत. तो फायनालिस्ट आहे. ‘बिग बॉस’मधून निघाल्यावर मी त्याच्या गावी जाणार आहे आणि त्याच्याकडुन क्युट असा ससा घेऊन येणार आहे. मला अशी अपेक्षा आहे की सूरज फायनालिस्ट असेल. त्याला आठ बहिणी आहेत. त्याच खूप मोठा परिवार आहे”.

आणखी वाचा – Video : निक्की तांबोळीच्या बाईईई… ची पुणेकरांमध्ये क्रेझ, दहीहंडीमध्ये गाणं वाजतात बेभान होऊन नाचले लोक, व्हिडीओ व्हायरल

पुढे इरिना म्हणाली, “मला असं वाटतंय की सूरजने हा खेळ जिंकावा. सूरज खूप चांगला माणूस आहे. पण तो खूप रागीट आहे. एका टास्कदरम्यान मी त्याचा अनुभव घेतला. मी त्याला थांबवत होते, त्याला शांत राहायला सांगत होते तेव्हा मी त्याचा राग पाहिला. बुक्कीत टेंगुळ देऊन त्याने काही चूक केली नाही पाहिजे याचीही मला भीती वाटते. आणि कोणतीच चूक त्याच्याकडून नाही झाली पाहिजे यासाठी मी प्रार्थना केली”.

Tags: Irina RudakovaIrina rudakova on bigg boss marathiirina rudakova on suraj chavan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
kangana ranuat on aamir khan

"घटस्फोटानंतरही एक्सला लाडाने हाक मारायची अन्…", कंगना रणौतने आमिर खानला सुनावलं?, म्हणाली, "मी कधीही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.