Bigg Boss Marathi season 5 update : यंदाच्या ‘बिग बॉस मराठी’च्या पर्वाने विविध क्षेत्रातील कलाकारांना एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला आहे. यंदाच्या या नव्या सीझनमध्ये कलाकार, रॅपर, गायक, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांना संधी देण्यात आली. यंदाच्या या नव्या पर्वात दोन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची एण्ट्री पाहायला मिळाली. एक म्हणजे कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर आणि दुसरा कोल्हापूरच्या मातीतील धनंजय पोवार म्हणजेच डीपी. आजवर या दोन्ही रील स्टारने प्रेक्षकांना उत्तम कंटेन्ट देत त्यांची मन जिंकली आहते.
विशेषतः आपल्या रीलने प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा रील स्टार म्हणजे धनंजय पोवार. धनंजय पोवार हा कंटेंट क्रियेटर, बिझनेस मॅन तसेच Vlogger आहे. धनंजयच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दहा लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. धनंजय सोशल मिडियावर महिला केंद्रित समस्या गमतीशीर अंदाजात मांडताना दिसतो. महाराष्ट्रातील फेमस रिल्सस्टार आणि प्रसिद्ध उद्योगपती डी पी म्हणजेच धनंजय पोवार हा थोड्याच दिवसांत अधिक लोकप्रिय झाला आहे.
धनंजय पोवार हा सतत कॉमेडी व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करत असतो. सोशल मीडियावर तो नेहमीच सक्रिय असतो. सध्या धनंजय ‘बिग बॉस’मराठीच्या घरात धुमाकूळ घालताना दिसत आहे. धनंजयने ‘बिग बॉस’च्या घरात येत त्याच्या विनोदी कलेने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. दोन्ही आठवड्यात धनंजय उत्तम खेळ खेळताना दिसत आहे. धनंजयचं सर्वच स्पर्धकांशी बऱ्यापैकी जुळत आहेत. पहिल्या आठवड्यात धनंजय नॉमिनेटही झाला होता. मात्र तमाम प्रेक्षकवर्गाच्या प्रेमापोटी धनंजय सेफ झाला.
धनंजयने माणसं ओळखायला शिकायला हवं. सध्या तो जिथे वावरत आहे तिथे असणारी माणसं कशी आहेत हे धनंजयने ओळखावं असा सल्ला आता त्याच्या आईने दिला आहे. धनंजयच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे .यामध्ये त्या लेकाला सल्ला देत असं म्हणताना दिसत आहेत की, “बघितलं का सापासारखी कात टाकणारे लोक कसे असतात. दिसतात कसे. धनंजय तू सावध राहा. ती माणसे कशी असतात ते ओळख. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा”.