शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi 5 : चक्क भांडी घासायचा कोकण हार्टेड गर्लला ट्रॉमा, ढसाढसा रडलीही अन्…; कसा निभाव लागणार?

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 2, 2024 | 12:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 update Ankita Walawalkar cried

‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात अंकिता वालावलकरला कोसळले रडू, नेमकं झालं तरी काय?

Bigg Boss Marathi 5 Update : ‘बिग बॉस मराठी’चे हे नवीन पर्व पहिल्या दिवसापासूनच चांगलेच गाजत आहे. ‘बिग बॉस’चे पर्व कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत आहे. यंदाच्या ‘बिग बॉस’मध्ये १६ स्पर्धक असून केवळ कलाकारच नव्हे तर रील स्टार्स, कीर्तनकार, गायक व अभिनेते व पुढारी नेते म्हणून ओळखले जाणारे स्पर्धक यंदाच्या ‘बिग बॉस’ मध्ये सहभागी झाले आहेत. यंदाच्या पर्वात कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकरच्या एण्ट्रीने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. ‘बिग बॉस’ सुरु होण्याआधी अनेक दिवस तिच्या नावाच्या चर्चा होत होत्या. अशातच तिची या घरात एण्ट्री झाली. अंकिता वेळोवेळी घरामध्ये संभाषणाद्वारे आपलं मत मांडताना दिसत आहे. तसेच तिच्याबरोबर इतरांकडून केल्या जाणाऱ्या वर्तणूकीवर ती व्यक्त होताना दिसत आहे. (Bigg Boss Marathi 5 Ankita Walawalkar Cried)

‘बिग बॉस’च्या दुसऱ्या दिवशी निक्कीने अंकिताबरोबर केलेल्या वर्तणूकीमुळे ती दुखावली होती. यामुळे तिला रडू कोसळले होते. अशातच आजच्या भागातही अंकिताला रडू कोसळले आहे. अंकिताने तिला भांडी घासण्याचा ट्रॉमा असल्याचे म्हटलं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात अंकिता, पुरुषोत्तम व आर्या बसलेले असताना अंकिता आर्याला भांडण न करण्याचे सांगत असते. यानंतर ती रडत रडत “मला भांडी घासण्याचा ट्रॉमा आहे” असं म्हणते. “मी भांडी नाही घासत. पण मी इथे तेसुद्धा करत आहे”. यावर आर्या तिला “मी भांडी घासेन” असं म्हणते. यानंतर अंकिता आर्याला “नाही मीच भांडी घासेन. कारण मला माझ्या कमतरतेवर मात करायची आहे. माझ्या घरच्यांना ही माहित आहे की, मी भांडी घासत नाही”.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : “ए चल हड…”, जान्हवी किल्लेकर व आर्याने एकमेकींना मारलं, हाणामारीचा व्हिडीओ समोर, नको नको ते बोलल्या अन्…

यापुढे ती आर्याला समजावताना असं म्हणते की, “जिथे आपल्याला भांडणं दिसतात. तिथून आपण लांब जायचं. भांडण नाही करायचं. आपण आपल्या हक्कासाठी बोलणं हे बरोबर आहे. जिथे चुकतं तिथे आपण बोललचं पाहिजे. पण समोरची व्यक्ती हिंसक होताना दिसत आहे तर आपण शांत राहायचं”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : “माकडचाळे व खोटं वागणारे…”, सूरज, धनंजय व घन:श्यामसाठी मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “सभ्य-असभ्यता…”

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात नॉमिनेशनसाठी प्रेक्षकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. अंकीता, वर्षा, सुरज, धनंजय व योगिता आदी स्पर्धक नॉमिनेशन प्रक्रियेत आहेत. त्यामुळे आता घरातून बाहेर कोण जाणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.  

Tags: bigg boss marathi 5Bigg Boss Marathi 5 Marathi Newsnkita Walawalkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Mahima Chaudhary talked on her relationship with tennis player Leander Paes

सुप्रसिद्ध अभिनेत्रीला बॉयफ्रेंडनेच फसवलं, दुसऱ्याच मुलीबरोबर पकडलं अन्...; म्हणाली, "माझ्या आयुष्यामध्ये..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.