Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’ आणि भांडणं, वाद हे समीकरण फारच जुनं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धक कोणत्या ना कोणत्या कारणावरुन सतत भांडतानाचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. ‘बिग बॉस’चे घर म्हणजे अनेकदा वाद भांडणासाठचे घर म्हणूनच ओळखले जाते. घरातील प्रत्येक स्पर्धक अंतिम फेरीत आपलं स्थान टिकवण्यासाठी आणि अंतिम फेरीत जाण्यासाठी धडपड करत असतो. अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वातही अंतिम टप्प्यात जाण्यासाठी स्पर्धकांमध्ये आतापासूनच चढाओढ सुरु झाली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरण्यासाठी स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. यासाठी ते एकमेकांना भिडत आहेत. याचाच एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. (Bigg Boss Marathi 5 new promo)
या प्रोमोमध्ये निक्की पॅडीसह घरातील काही सदस्यांवर भडकलेली दिसून येत आहे. तिच्या खाजगी वस्तूंना हात लावल्यामुळे ती त्रागा करत असल्याचे यातून दिसून येत आहे. या प्रोमोमध्ये निक्की पॅडीला म्हणतेय, “माझ्या वस्तुंना का हात लावला?”. त्यावर पॅडी म्हणतो,”माझी ड्युटी करतोय”. यावर उत्तर देत निक्की म्हणते, “मला कामं करायची आहेत, समजलं ना”. त्यानंतर राग अनावर झालेली निक्की पॅडीच्या कपड्यांची फेकाफेकी करते. यावर पॅडीही रागाने निक्कीला म्हणतो, “माझ्या कपड्यांना हात लावू नकोस”. त्यानंतर पुढे कोकण हार्टेड गर्ल अंकिता म्हणते की, “तुझ्या आवाजाला इथे सगळ्यांनी घाबरुन राहायचं का?”. त्यावर निक्की ‘हो’ असं उत्तर देते. त्यानंतर निक्की अंकिताची धक्काबुक्की झालेलं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या भाऊच्या धक्क्यावर कालच्या भागात खिलाडी अक्षय कुमारने हजेरी लावली होती. अक्षय कुमारच्या येण्याने ‘भाऊच्या धक्क्या’ला हाऊसफुल्लचा बोर्ड लागला. आता नवा आठवडा सुरू झाला असून नव्या आठवड्यातही सदस्य फुल ऑन कल्ला करताना दिसून येणार आहेत. तसंच ”बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या आठवड्यात एकही सदस्य घराबाहेर पडला नाही. त्यामुळे आता तिसऱ्या आठवड्यात सदस्य कसा कल्ला करणार हे पाहावे लागेल.?
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात एक नियम आहे, जो की शारीरिक न होता टास्क खेळणे. मात्र या घरात या नियमाचे अनेकदा उल्लंघन होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. निक्की व कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर याआधी एकमेकींना भिडल्या होत्या. त्यामुळे आता या दोघींच्या पुन्हा एकदा भांडण्याने घरात अजून काय कल्ला होणार? ‘बिग बॉस’ या दोघींच्या भांडणात पडणार का? हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.