शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : निक्कीने सगळ्याच मर्यादा ओलांडल्या, आर्याचा काढला बाप, प्रेक्षकांनी संस्करांवर निर्माण केलं प्रश्नचिन्ह

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 7, 2024 | 10:46 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily updates Nikki Tamboli insulting statement about Aarya Jadhav father netizens got angry

Bigg Boss Marathi 5 च्या घरात निक्कीची जीभ पुन्हा घसरली, आर्याच्या वडिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी च्या घरात कायम आपल्या बेताल वक्तव्यांनी चर्चेत राहणारी सदस्य म्हणजे निक्की तांबोळी. निक्कीने आजवर अनेक बेताल वक्तव्य करत घरातील इतर सदस्यांचा अपमान केला आहे. घरातील सदस्यांना कायम कमी लेखणं आणि अपमानास्पद वागणूक देणं यात निक्कीने परिसीमा गाठली आहे आणि याबद्दल तिचे वेळोवेळी कानही टोचले गेले आहेत. पण सुधारेल ती निक्की कसली. माफी मागूनही निक्की चुका करत आली आहे. यापैकी नुकतीच झालेली एक चूक म्हणजे निक्कीने आर्याच्या वडिलांबद्दल केलेलं अपमानास्पद वक्तव्य. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)

बिग बॉस मराठीच्या घरात सातव्या आठवड्यात घराच्या कॅप्टनपदी बहुमताने सूरजची निवड करण्यात आली आहे. ‘टीम B’सह निक्की-अरबाजने यांनीदेखील सूरजच्या कॅप्टन्सीसाठी पाठिंबा दिला होता. यानंतर तरी घर शांत राहील अशी अपेक्षा सर्वांनाच होती. मात्र, घडलं काहीतरी वेगळंच…सूरज कॅप्टन झाल्यावर अगदी पहिल्याच दिवशी चहा बनवण्यावरून आर्या व निक्कीमध्ये जोरदार भांडणं झालं आणि याचं कारण होतं चहाचे भांडे न घासणे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – “तोच का?, मी कॅप्टनच्या लायकीची नाही का?”, सूरज कॅप्टन झाल्यानंतर Bigg Boss वरच भडकली जान्हवी, ढसाढसा रडत जाब विचारला अन्…

निक्कीने स्वत:साठी केलेल्या चहाची भांडी घासण्यास नकार दिला. त्यामुळे घरात मोठी वादावादी झाली. आर्याने नंतर ही भांडी उचलून निक्कीच्या बेडवर ठेवली. तरीही निक्की ऐकली नाही म्हणून आर्याने शेवटी उरलेली भांडी उचलून लपवली. यानंतर झालेल्या भांडणात निक्कीने आर्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केली. यावर आर्याने प्रचंड संतापून “बाप काढायचा नाही…” असं तिला सांगितलं. सूरजने देखील आर्याला पाठिंबा देत बाप नको काढू असं उत्तर दिलं आहे. याआधीही निक्कीने टास्कदरम्यान असंच बेताल वक्तव्य केलं होतं, तेव्हा डीपी दादांनी तिला समज दिली होती. मात्र निक्कीच्या बाबतीत ये रे माझ्या मागल्या.. हेच होत असलेलं पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “मी तिला बघायचो, ती शायनिंग मारत…”, सूरज चव्हाणने सांगितली त्याची लव्हस्टोरी, म्हणाला, “आमचं वाईला शूट असताना…”

त्यामुळे एखाद्या क्षुल्लक कारणामुळे एखाद्याच्या वडिलांचे नाव घेत अपमानास्पद वक्तव्य करणे हा कितपत योग्य आहे? आणि स्पर्धक म्हणून खेळताना अशा अपमानास्पद वक्तव्यामुळे माणुसकी आणि संस्कार विसरले जातात की काय? असा प्रश्न पडतो. त्यामुळे आता निक्कीच्या वागणुकीबद्दल तिला काय कठोर शिक्षा होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कॅप्टन्सी काढून घेण्यापलीकडे बिग बॉस हिला काय शिक्षा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Tags: Aarya Jadhavbigg boss marathi 5nikki tamboli
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss 18 Update

कल्पनाही करु शकणार नाही अशी आहे सलमान खानच्या 'बिग बॉस १८' ची थीम, प्रीमियरच्या तारखेपासून स्पर्धकांच्या नावांपर्यंत सर्व काही जाणून घ्या…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.