Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकतेच कॅप्टन्सी कार्य पार पडले आणि या घराला अरबाज हा नवीन कॅप्टन मिळाला आहे. या खेळात त्याला निक्की व जान्हवी यांची उत्तम साथ मिळाली. त्यामुळे यंदाच्या पर्वात दोन वेळा कॅप्टन बनण्याची संधी अरबाजला मिळाली आहे. ‘कोणाचं गोड पाणी कोणाची तहान भागवणार?’ हे अनोखं कॅप्टन्सी कार्य घरात पार पडलं. निक्कीने पहिल्याच डावापासून हा संपूर्ण गेम फिरवल्याचं पाहायला मिळालं. ‘बिग बॉस’च्या घरात आठव्या आठवड्याच्या कॅप्टन्सीसाठी वर्षा, सूरज, अरबाज आणि धनंजय असे चार दावेदार होते. या सदस्यांच्या समोर ‘बिग बॉस’ पाण्याने भरलेले डबे ठेवले होते. अंकिता, पॅडी, निक्की आणि जान्हवी या चार सदस्यांना पळत जाऊन बझर वाजवायचा होता. जो सदस्य आधी बझर वाजवणार तो एक ग्लास पाण्याचे दर ठरवणार होता आणि कार्याच्या अंतिम फेरीत ज्याच्याकडे सर्वाधिक बीबी करन्सी असेल तो सदस्य विजयी होणार होता. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
पहिल्या फेरीत शून्य ग्लास विकल्याने सूरज या स्पर्धेतून बाहेर पडतो. अरबाज सर्वाधिक ४००० जंगल करन्सी जिंकतो. दुसऱ्या फेरीतही निक्की बझर वाजवते आणि अरबाजकडील पाण्याच्या ग्लासची किंमत सर्वाधिक निश्चित करते. त्या फेरीत जान्हवी-निक्की या दोघी मिळून अरबाज आणि वर्षा यांच्याकडील सर्वाधिक ग्लास विकत घेतात आणि डीपीला बाहेर काढतात आणि मग वर्षा व अरबाज यांच्यात लढत होते. यात अरबाज घरचा कॅप्टन होतो. यावेळी वर्षा यांनी अरबाज, निक्की व जान्हवी यांच्याबरोबर संगनमत केलेले असते. त्यामुळे त्या ‘टीम बी’बरोबर न राहता अरबाज-निक्की यांच्याबरोबर डील करतात. वर्षा यांनी अरबाज-निक्कीची साथ दिल्याने ‘बी टीम’ ठरवते की वर्षा यांच्याकडील पाणी अजिबात खरेदी न करता त्यांना हरवायचे.
डीपी, अंकिता आणि पॅडी सगळेच वर्षा यांच्यावर भडकलेले असतात. ते वर्षा यांच्यासोबत चर्चा करतात, मात्र त्यांच्या एकमेकांबद्दल खूप तक्रारी असतात. वर्षा यांची तक्रार असते की ‘बी टीम’ने त्यांना कधी आपलेसे केले नाही. निक्की व अरबाज त्यांना टास्क अधिक चांगलं समजावतात, असे त्यांचे मत असते. याबद्दल त्या असं म्हणतात की, “मी या टीममध्ये असल्याची भावना मला कधी वाटली नाही. मला नेहमी तुम्ही गृहीत धरलं असं वाटतं राहिलं. तेव्हा फक्त बहुमतसाठी मला वापरलं जातं असल्याचे निक्कीचे शब्द मला आठवले. तुमच्याकडे स्ट्रॅटेजीस असतात, तुमचं डोकं टास्कसाठी चांगलं चालतं आणि यात माझा कोणताही टोमणा नाही. त्यामुळे मला कधी कधी फक्त बहुमतसाठी वापरलं जात असल्याचे वाटत राहिलं”.
आणखी वाचा – 21 September Horoscope : मेष, सिंह व कन्या राशीच्या लोकांची व्यवसायात होणार प्रगती, शनिवारचा दिवस नेमका कसा?
यापुढे त्या असं म्हणल्या की, “आता निर्णायक क्षणी तुम्ही माझ्याकडे आला आहात, हेच तुम्हाला मागच्या वेळेस नव्हतं वाटलं का? आपल्यातला संलग्नपणा कमी झाला. ‘बिग बॉस’ने मला त्यांच्या गृपमध्ये टाकलं तेव्हा निक्की अरबाजने मला न सांगता टास्क समजावला. यामुळे मी आश्चर्यचकित झाले. हे मला आपल्या ग्रुपमध्ये कुणी कधी समजावलं नव्हतं. त्यामुळे मला कायम आपल्या ग्रुपमध्ये गृहीत धरलं जात असल्याची भावना वाटत राहिली”.