शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “त्याला सगळं कळतं”, अरबाजने वैभवकडे केली सूरजची चुगली, म्हणाला, “तो साधा माणूस नाही तर…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 14, 2024 | 2:39 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily updates Arbaaz Patel and Vaibhav Chavan Gossip on Suraj Chavan Behavior

Bigg Boss Marathi 5 च्या घरात सूरज चव्हाणच्या साध्या वागणुकीवर अरबाज-वैभव यांच्यात गॉसिप

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या या नवीन पर्वाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या घरातील सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणचा साधेपणा लोकांना भावतो आहे. नुकत्याच पार पडलेल्या गणपती विशेष भागात सूरजने केलेल्या कृतीने अनेकांची मनं जिंकली. गणेशोत्सवानिमित्त झालेल्या विशेष भागात ‘बिग बॉस मराठी’च्या स्पर्धकांना उकडीचे मोदक देण्यात आले होते. यावेळी सगळ्यांनीची मोदक खाल्ले. यावेळी सूरजलादेखील  मोदक देण्यात आला, तेव्हा “एक मोदक गणपती बाप्पाला दिला तर चालेल का?” असं सूरज म्हणाला आणि त्याची हीच कृती कौतुकास्पद ठरली. सूरज चव्हाणने स्वत: मोदक खाण्याआधी गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून ठेवला. त्याच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक झालं. (Arbaaz and Vaibhav Gossip on Suraj)

सूरजच्या या छोट्याश्या कृतीवर नेटकऱ्यांनी “एकच मन आहे किती वेळा जिंकणार”, ‘सूरज भावा तुला फुल्ल सपोर्ट”, याच साधेपणामुळे आम्ही सूरजचे कट्टर फॅन आहोत” अशा कमेंट्स करत त्याचं कौतुक केलं. अशातच नुकत्याच झालेल्या कोईन्सच्या टास्कमध्ये “मी साधा माणूस आहे. मला पिझ्झा, बर्गर नाही तर भाकरी-कालवण आवडतं” असं म्हटलं.  ‘बिग बॉस’च्या घरात शुक्रवारच्या भागात ज्यांच्याकडे सर्वात जास्त कॉईन्स आहेत त्या कोणत्याही स्पर्धकाला एखादा लक्झरी पदार्थ विकत घेण्याची संधी ‘बिग बॉस’ने दिली होती. यात केक, बिर्याणी आणि पिझ्झा असे तीन पदार्थ असतात. मात्र सूरज यापैकी कोणताही पदार्थ विकत घेण्यास स्पष्ट असा नकार देतो. सूरजचा हा साधा भोळा त्याच्या चाहत्यांना, महाराष्ट्रातील जनतेला आवडत असला तरी घरातील अरबाज व वैभव यांना सूरजबद्दल असूया वाटत आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरातून नक्की कोण बाहेर जाणार? ‘त्या’ कृतीमुळे आर्या ठरणार का नॉमिनेशनची बळी?

याबद्दल त्यांनी शुक्रवारच्या भागात सूरजबद्दल गॉसिप केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अरबाज वैभवला असं म्हणाला की, “त्याला सगळं काही कळतं. मी तुला सांगतो तो खूप शहाणा आहे. त्याने गणपती बाप्पाजवळ मोदक ठेवला. तिथे जाऊन पाया पडला. त्यामुळे रितेश भाऊंनी पण त्याचे कौतुक केलं. पण त्याला सगळं काही कळतं. तो साधा माणूस आहे तर त्याला हे कसं कळलं की टास्कमध्ये वैभवने पॅडी दादाला शिवी दिली”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “या घरात तुम्ही वाईल्ड कार्ड म्हणून आला नाहीत तर…”, संग्रामच्या खेळावर रितेशची प्रतिक्रिया, म्हणाला, “अपेक्षा होती पण…”

यावर वैभवदेखील अरबाजबद्दल असं म्हणतो की, “त्याच्याबद्दल माझं म्हणणं चुकीचे असावं. मी जो विचार करतोय तो चुकीचा असावा. त्याचं वागणं खरं असावं आणि आपण चुकीचे असावे”. दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात सातव्या आठडव्यात निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अंकिता वालावलकर, अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर आणि आर्या जाधव हे सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता यांच्यापैकी घरात कोण राहणार आणि कोणता सदस्य या घराचा निरोप घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Tags: Arbaaz PatelSuraj ChavanVaibhav Chavan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
deepika padukone on nanny

लेकीचा सांभाळ करायला नॅनी नाही; दीपिका पदुकोण अशी करणार मुलीची देखभाल, ‘या’ अभिनेत्रीला फॉलो करतेय

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.