Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा आठवडा गोलीगत सूरज चव्हाणने चांगलाच गाजवला. याबद्दल ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेशने सूरजचं भरभरून कौतुक केला. त्या आठडव्यात सूरज कॅप्टन झालेला नसला तरी त्याने विरुद्ध टीमबरोबर दोन हात केले होते. पहिले दोन आठवडे शांत असणाऱ्या सूरजने तिसऱ्या आठवड्यात कॅप्टनसी टास्कमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला. प्रेक्षकांनाही त्याचा खेळ आवडला असून, शनिवारच्या ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेशही त्याचं कौतुक करताना दिसला. सूरजचा या घरात आल्यानंतरचा नवीन स्वॅग पाहायला मिळत आहे. सूरजच्या हळहळू खेळत सहभागी होत असून त्याचा सहभाग सर्वांनाचं आवडत आहे. अशातच त्याच्या नवीन स्वॅगचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे आणि या प्रोमोमध्ये तो आता अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये सूरज अभिजीत व आर्याला धीर देताना पाहायला मिळत आहे. या नवीन प्रोमोमध्ये सूरज असं म्हणत आहे की, “जिथे अत्याचार होणार तिथे सूरज चव्हाण उभा राहणार. बोलत नाही म्हणून गरिबांचा फायदा घेतात. निक्कीने केलं तर आपण सहन करून घ्यायचं आणि आर्याने केलं तर…” यापुढे तो असं म्हणतो की, “आपल्या टीमला कुणी काही बोललं तर आपण नडायचं” यापुढे तो आर्याला “तू नड” असंही म्हणतो. त्याचा हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi मध्ये रंगणार नॉमिनेशन टास्क, कोण घराबाहेर जाणार? रंगली चर्चा
सूरजला फक्त त्याच्या प्रेक्षकांकडून, चाहत्यांकडून तसंच कलाकारांकडूनही भरपूर पाठिंबा मिळत आहे. सूरज सध्या ट्रेंडिंगमध्ये आला असून तो कायमच चर्चेत असतो. सुरुवातीच्या काही दिवसांत सूरजला गेम कळला नव्हता, त्यामुळे सूरज थोडासा घाबरायचा. त्याच नीट वागणं, बोलणं प्रेक्षकांना कळत नसेल अशी भीती त्याला वाटत होती. मात्र आता ही त्याची भीती दूर पळाली असून त्याने खेळ खेळायला सुरुवात केली आहे. सूरजने स्वतःचा खेळ खेळायला सुरुवात केली आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वात सूरज चव्हाणने सहभाग घेतला आहे. तेव्हापासून त्याच्याबद्दलच्या अनेक आशा-अपेक्षा चाहत्यांकडून वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सूरजचा या घरातील सहभाग वाढला असून तो आता प्रत्येक कार्यात सहभागी होत आहे. घरातील प्रत्येक टास्कमध्ये तो सहभागी होत असून प्रत्येक मुद्द्यावर तो आपलं मत मांडत आहे. सूरजच्या ‘बिग बॉस’च्या घरातील वावराबद्दल, त्याच्या वागणुकीबद्दल, खेळातील टास्कमधील सहभागाबद्दल त्याचे अनेक चाहते कौतुक करत आहेत.