Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चे नवीन पर्व सुरु झालं तेव्हापासून या पर्वाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अल्पावधीतच या पर्वातील स्पर्धकांनी प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. या घरातील राडे, भांडण व वाद हे काय नवीन नाहीत. दिवसेंदिवस घरात टास्कवरुन किंवा घरातील कामावरुन राडे व भांडण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे घरातील सर्व स्पर्धकांमध्ये सतत वाद होतानाचे पाहायला मिळत आहे. अशातच कालच्या बिग बॉसच्या घरातही राडा झाला. निक्कीने घरातील सर्व सदस्यांचे सामान फेकून दिले. यामुळे घरातील सर्वच स्पर्धक तिच्यावर तिच्यावर खूपच रागावले होते. निक्कीने बिग बॉसच्या घरात घातलेल्या या राड्यात तिला तिच्या टीमची म्हणजेच वैभव, अरबाज व जान्हवीचीही साथ मिळाली. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
‘बिग बॉस मराठी’च्या कालच्या भागात पॅडी म्हणजेच पंढरीनाथ कांबळे यांनी निक्कीच्या कपड्यांच्या कंटेनरला हात लावला. यामुळे आपल्या खाजगी वस्तूंना हात लावल्याच्या रागात निक्कीने घरातील सर्वांच्या वस्तूंची नासधूस केली. यामुळे निक्कीने घरात खूपच कल्ला केला. यामुळे घरातील ज्या ज्या सदस्यांचे सामान निक्कीने फेकले होते. त्या त्या सदस्यांमध्ये खूपच राडा झाला. निक्कीने तिच्या टीमव्यतिरिक्त सर्वांचे सामान उचलून फेकून दिले. जान्हवीने अंकिताला मिळालेल्या कॅप्टन्सीबद्दलही वक्तव्य केलं. यावेळी जान्हवी अंकिताला कॅप्टन्सी भीक म्हणून मिळाली असल्याचे तिने म्हटलं. यावर जान्हवीने निक्कीला “अंकिताला कॅप्टन्सी भीक म्हणून मिळाली आहे” असं म्हटलं.
तसंच यापुढे निक्की व जान्हवी यांनी वर्षा ताईंच्या चुकीच्या निर्णयामुळे अंकिता कॅप्टन झाली आहे. त्याच्या दूटप्पी व पक्षपातीपणामुळे अंकिता कॅप्टन झाली असल्याचेही म्हटलं. त्यामुळे निक्कीने घरातील सर्व सदस्यांचे सामान उचलून फेकून दिले. यामुळे घरात खूप कल्ला झाला. बुलेट ट्रेनच्या टास्कमध्ये योगिता ज्या एका प्रवाशाला बुलेट ट्रेनमध्ये ठेवणार, त्याचे नाव कॅप्टन म्हणून जाहीर होणार असते. मात्र, योगिता ही पॅडी, निक्की, अभिजीत, वैभव यांना बाद करते आणि अंकिताची कॅप्टन म्हणून निवड करते. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वाची पहिली कॅप्टन होण्याचा बहुमान अंकिताला मिळतो.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या कालच्या भागात चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन होताच सर्व सदस्य त्यांच्याबरोबर जोडले गेले. सदस्य या पाहुण्यांबरोबर वेळ घालवताना दिसून आले. तर काहींनी या पाहुण्यांवरुन भांडणेदेखील केली. पण पाहुण्यांनी मात्र घरातल्या सदस्यांसोबत चांगला वेळ घालवला.