Bigg Boss Marathi Season 5 : कलर्स मराठी’ वाहिनीवर ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन नव्या ढंगात, नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सीझनने अल्पावधीतच रेकॉर्ड ब्रेक करायला सुरुवात केली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा मंच रितेश भाऊने दणाणून सोडला आहे. नव्या सीझनमधील रितेश भाऊची लयभारी स्टाईल, नाविन्य, तरुणपण, कल्ला या सर्वच गोष्टी सीझनचा विक्रम रचण्यात कारणीभूत ठरत आहेत. ग्रँड प्रीमियरपासून सुरु झालेली ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनची क्रेझ आता दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसत आहे. (Genelia Deshmukh praised Riteish Deshmukh)
‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाने सर्वांनाच वेड लावलं आहे. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी’ची आणि रितेश भाऊच्या कमाल होस्टिंगची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. रितेशच्या ‘भाऊच्या धक्क्या’ हा दिवसेंदिवस सर्व रेकॉर्ड्स मोडत आहे. खरंतर ‘बिग बॉस मराठी’ने दर आठवड्याला स्वत:चाच रेकॉर्ड मोडतानाचे पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व २८ जुलैपासून सुरु झालं. या कार्यक्रमाला सुरु होऊन आता पाच आठवडे पूर्ण झाले असून गेल्या आठवड्याच्या भाऊचा धक्का विशेष भागाचा टीआरपी समोर आला आहे.

विशेषत: वीकेंडला म्हणजेच ‘बिग बॉस मराठी’च्या भाऊच्या धक्क्याला यंदा सर्वाधिक टीआरपी मिळाला आहे. ४.४ TVR इतकी रेटिंग या कार्यक्रमाला मिळाल्यानंतर रितेशची पत्नी जिनिलीयाने नवऱ्याचं तोंडभरून कौतुक केलं आहे. ‘बिग बॉस मराठी’ने सर्वाधिक टीआरपी रचल्याची पोस्ट शेअर करत जिनिलीयाने नवऱ्यासाठी कौतुकास्पद ओळी लिहिल्या आहेत. यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, “आणि अशाप्रकारे दर आठवड्याला तुमचा टीआरपी चांगला वाढत आहे. तुम्ही फक्त तुमचे रेकॉर्ड मोडतच नाही आहात, तर तुम्ही नवनवीन रेकॉर्डस् बनवतही आहात”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : “सूरजला शहाणपणा शिकवू नको”, अंकितावर भडकले प्रेक्षक, म्हणाले, “त्याला समजून सांगा पण…”
दरम्यान, दर आठवड्याच्या शेवटी ‘बिग बॉस मराठी’चा भाऊचा धक्का प्रेक्षकांकडून पाहिला जातो. दर वीकेंडला रितेश देशमुख घरात चुकीचं वर्तन करणाऱ्या सदस्यांची शाळा घेतो तर चांगले खेळ खेळणाऱ्यांचे कौतुकही करतो. रितेशने ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन होस्टिंगची सूत्र हाती घेतल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. शोचा वाढता जाणारा टीआरपी पाहून जिनिलीया देशमुखचा आनंददेखील गगनात मावेनासा झाला आहे.