रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “भाऊ जान्हवी, निक्कीचीच लायकी काढा”, रितेश देशमुखला प्रेक्षकांचा सल्ला, म्हणाले, “टीम एची वाट लावा आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 30, 2024 | 5:16 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5

भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख घेणार का जान्हवी, निक्कीची शाळा, प्रेक्षकांनी केली मागणी

Bigg Boss Marathi 5 :  ‘बिग बॉस मराठी’चे नवे पर्व सुरु झाल्यापासून या पर्वाची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. हा वादग्रस्त शो छोटा पडदा गाजवताना दिसत आहे. या शोमध्ये नेहमीच स्पर्धकांमध्ये वादावादी झालेली पाहायला मिळते. यंदाच्या या नव्या पर्वात अभिनेते, अभिनेत्री, गायक, रॅपर, रील स्टार यांनादेखील सहभाग होण्याची मोठी संधी मिळाली. ही स्पर्धक मंडळी ‘बिग बॉस’च्या घरात तुफान राडे करताना दिसत आहेत. हे राडे आटोक्यात आणण्यासाठी ‘बिग बॉस’ व या शोचा होस्ट रितेश देशमुख स्पर्धकांवर नजर ठेवून आहेत. यंदाच्या या नव्या पर्वाच्या होस्टिंगची जबाबदारी रितेश देशमुखने स्वीकारली आहे.

यापूर्वीच्या ‘बिग बॉस मराठी’च्या सीझनमधील प्रत्येक विकेंडला महेश मांजरेकर त्यांच्या चावडीवर स्पर्धकांची शाळा घ्यायचे. याची जागा आता भाऊच्या धक्क्याने घेतली आहे. शो सुरु झाल्यापासूनच सोशल मीडियावर रितेशची मांजरेकरांबरोबर तुलना होत आहे. अनेकदा या ठिकाणी महेश मांजरेकरच हवे होते, अशा कमेंट्स सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. अशातच नव्या पर्वाच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश स्पर्धकांची शाळा घेताना दिसला आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : बाई‌‌ऽऽऽऽऽ…; अभिजीतने निक्कीच्या वाढदिवसानिमित्त गायलं ‘हे’ खास गाणं, दोघांच्या मैत्रीची जोरदार चर्चा, शुद्ध मैत्री की Strategy?

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

गेले तीन आठवडे भाऊच्या धक्क्याने अक्षरशः गाजवले. रितेशने भाऊच्या धक्क्यावर स्पर्धकांची चांगलीच कानउघडणी केली. आणि स्पर्धकांपर्यंत महाराष्ट्राचा पाठिंबा पोहोचवला. यानंतर आता चौथ्या आठवड्यात भाऊचा धक्का काय गाजणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या. याचा एक प्रोमो कलर्स मराठी या ऑफिशिअल वाहिनीवरुन पोस्ट करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये रितेश देशमुख स्पर्धकांची शाळा घेणार असल्याचं समोर आलं आहे.

आणखी वाचा – जगप्रसिद्ध गायक जस्टिन बीबर झाला बाबा, घरी चिमुकल्याचे आगमन, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

“‘बिग बॉस’मध्ये जान्हवीने सगळ्यात महत्त्वाचा नियम ब्रेक केला यावर काय ॲक्शन घेणार हे बघायचं आहे. जान्हवीने आर्याला धक्का दिला”, “रितेश सर आज जान्हवीचा जाळ काडा. ती पॅडी दादाच्या करिअरवर बोलत आहे”, “रितेश भाऊ आज जान्हवी व निक्कीला त्यांची काय लायकी आहे हे दाखवून द्या. सारखी दुसऱ्यांची लायकी काढत असतात”, “हा आठवडा आर्याने गाजवला तो ही योग्य पद्धतीने रितेश सर तिचं कौतुक करा आणि ती बरोबर होती हे बी टीमला ही कळु दया. खासकरुन अभिजीतला”, “जान्हवीला आज घराबाहेर काढा”, “भाऊच्या धक्क्यावर जरा टीम एची वाट लावा. सगळे माजलेत”, अशा अनेक कमेंट प्रेक्षकांनी करत रितेशला जाब विचारायला सांगितलं आहे.

Tags: Bhaucha Dhakka Public Reviewbigg boss marathibigg boss marathi 5
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Itsmajja and Media One Solutions Ganapati special song Bappa Aamcha Aala released on 27th August stay tuned

गणेशोत्सवात एकच गाणं वाजणार!, ‘बाप्पा आमचा आला’ लवकरच तुमच्या भेटीला, पोस्टर प्रदर्शित

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.