Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं सीझन सध्या विशेष चर्चेत आलेलं पाहायला मिळत आहे. यंदाच्या या पर्वात अभिनेते, अभिनेत्रींबरोबर गायकही या घरात सहभागी झाले होते. अशातच यंदाच्या पर्वात मराठमोळा गायक अभिजीत सावंतच्या एन्ट्रीने साऱ्यांना अतिशय आनंद झाला. अभिजीत या शोमुळे विशेष चर्चेत आलेला पाहायला मिळालं. ‘बिग बॉस’च्या घरात अभिजीत पहिल्या दिवसापासून सर्वांबरोबर मिळून मिसळून राहत गेम खेळत आहे. याशिवाय त्याचे जास्त कोणाशी वाद देखील झालेले नाहीत. त्यामुळे अभिजीतचा स्वभाव प्रत्येकाला भावतोय.
अगदी भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने सुद्धा अनेकदा अभिजीतचं कौतुक केलं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात काही दिवसांपूर्वी रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर प्रत्येक सदस्याला कुटुंबीयांकडून आलेले व्हिडीओ मेसेज दाखवले होते. यावेळी अभिजीतच्या दोन्ही मुलींनी लाडक्या बाबासाठी खास व्हिडीओ बनवून पाठवला होता. “तू उत्तम खेळत आहेस. असा खेळत राहा. इंडियन आयडॉल जिंकलास तेव्हा आम्ही नव्हतो पण, आता ‘बिग बॉस’ जिंकताना आम्हाला तुला पाहायचंय” असं त्याच्या दोन्ही मुली या व्हिडीओमध्ये म्हणाल्या होत्या. आहना आणि स्मिरा अशी त्याच्या मुलींची नावं आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : …अन् निक्की रडली! टास्कदरम्यान घडली मोठी चूक, कमावली फक्त ‘इतकी’ रक्कम, नेमकं काय घडलं?
त्यानंतर आता ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धकांच्या कुटुंबियांची एण्ट्री झालेली पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात समोर आलेल्या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ सर्व सदस्यांना फ्रिज होण्याचे आदेश देतात. आणि घराचा दरवाजा उघडतो आणि अभिजीतची पत्नी घरात एंट्री करते. ती येऊन अभिजीतला मिठी मारते आणि त्याला किसही करते. अभिजीतला बायकोला पाहून अश्रू अनावर होतात. त्यानंतर अभिजीतला आणखी एक मोठं सरप्राईज मिळतं.
आणखी वाचा – ‘केबीसी १६’ चा पहिला करोडपती ठरला जम्मू-काश्मीरचा २२ वर्षीय युवा, अचूक उत्तर देऊनही गमावले सात कोटी रुपये
अभिजीतच्या दोन्ही मुली आहना आणि स्मिरा यादेखील घरात येतात आणि धावत येत अभिजीतला घट्ट मिठी मारतात. दोन्ही मुलींना दोन महिन्यांनी समोर पाहून अभिजीत ढसाढसा रडतो, तर त्याच्या दोन्ही मुलीही बाबाला समोर पाहून रडू लागतात. यावेळी घरातील इतर स्पर्धकांचेही डोळे पाणवतात. तर घरात येताच अभिजीतची धाकटी लेक ‘बिग बॉस’ यांना सवाल करते, ती “‘बिग बॉस’ मी इथे राहू शकते का?”, असं विचारते, हे ऐकून ‘बिग बॉस’ तिला उत्तर देत, “चला या पर्वाला आणखी एक वाईल्ड कार्ड स्पर्धक मिळाला”, असं म्हणतात. हे ऐकून सगळेच खूप खुश होतात, आणि अभिजीतच्या लेकींबरोबर गप्पा-गोष्टी करु लागतात.