Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’ सुरु झाल्यापासून हा शो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. ‘बिग बॉस मराठी’ सुरु झाल्यापासूनच अरबाज व निक्कीमध्ये जवळीक पाहायला मिळालेली. केवळ प्रेक्षकांनाच नव्हे तर घरातील सदस्यांनादेखील ती जाणवलेली. निक्कीचा विषय आला की, अरबाज नेहमीच हळवा होतो किंवा तिच्यासाठी अगदी जीव तोडून खेळतो. नुकत्याच झालेल्या एका आठवड्यात त्याच्या निक्कीबरोबरच्या दूराव्यामुळे अरबाज फारच बिथरल्यासारखा दिसला. त्याला अभिजीत-निक्की यांची एक टीम पाहवत नव्हती. त्यामुळे त्याची सतत चिडचिड होत होती. त्याला नात्याबद्दल विचारलं तेव्हा त्याने आपण कमिटेड असून गर्लफ्रेंड असल्याचं सांगितलं. (Bigg Boss Marathi 5 Arbaaz Patel father)
कमिटेड असूनही अरबाजचे निक्कीबरोबरचे वागणे अनेकांना खटकत आहे. घरातील सदस्यांनी त्याला याबद्दल जाणीवही करुन दिली आहे. पण दुराव्यानंतरही अरबाज पुन्हा निक्कीकडे गेल्याचे पाहायला मिळाले. आणि त्याच्या या वागण्यावर घरातील सदस्य चांगलेच नाराज झाले. निक्कीबद्दल अरबाजच्या मनात असलेल्या भावनांवरून रितेश देशमुखनेही त्याची चांगलीच शाळा घेतली होती. अशातच अरबाजच्या वडिलांनी आता निक्की व अरबाज यांच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. ‘7 Star मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अरबाजच्या खेळाबद्दल व त्याच्या निक्कीबद्दलच्या नात्याबद्दल सांगितलं आहे.
याबद्दल अरबाजच्या वाडिलांनी असं म्हटलं आहे की, “अरबाजने मैत्रीचे नाते पुढे नेलं पाहिजे. आज ‘बिग बॉस’सारख्या इतक्या मोठ्या शोमध्ये त्याने कमिटेड असल्याचे म्हटलं आहे. तर त्या विषयावर तो ठाम राहिला पाहिजे. महाराष्ट्राची जनता हे सगळं बघत आहे आणि आपली जनता ही खूप प्रेमळ आहे. त्यामुळे या जनतेला खोटारडापणा बघून आणि ऐकून खूप विचित्र वाटते. कमिटेड असूनही तो घरात जे वागत आहे ते कुठे तरी खोटे वाटत आहे. मलाही वाटतं आहे की, ते त्याने हे करु नये. वैभव व जान्हवीबरोबर त्याने चांगला खेळ खेळला पाहिजे. कारण मैत्रीत पण एक ताकद असते आणि त्याच ताकदीला धरून त्याने निक्कीला सामोरं गेलं पाहिजे. अभिजीतकडे ती वेगळी वागते आणि आरबाजकडे वेगळी… निक्की अरबाजला दूरही करते आणि पुन्हा जवळही घेते. तिने त्याला तिच्या चक्रव्यूहमध्ये गुंतवून टाकलं आहे आणि ते दिसत आहे”.
आणखी वाचा – बाप्पा शब्द चुकीचा उच्चारणाऱ्यांवर भडकली जुई गडकरी, राग व्यक्त करत म्हणाली, “बप्पा नसतं ते…”
यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “अरबाजला असं वाटतं असेल की, निक्की थोडी स्ट्रॉंग प्लेयर आणि गेम चेंजर आहे. पण ती एकीकडे म्हणते की मी इथे गेम खेळायला आली आहे आणि दुसरीकडे घरात कुणी चांगला खेळाडू यावा अशी इच्छाही ती बोलून दाखवते. अभिजीतलादेखील ती बोलली होती की, एक स्त्री म्हणून पुरुषाला प्रभावित कसं करता येईल हे मला माहीत आहे. त्यामुळे मी अरबाजला समजावेन. निक्कीला मी वाईट म्हणणार नाही. ती तिचा गेम खेळत आहे आणि प्रत्येकजण त्यांच्या पद्धतीने उत्तम खेळत आहेत. पण मी अरबाजला सांगू इच्छितो की, अरबाजने स्वत:वर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. स्वत:चा गेम दाखवला पाहिजे. तुझे जे चांगले मित्र आहेत, त्याच्याबरोबर राहून चांगलं खेळलं पाहिजे”.