शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : निक्की विरोधात अरबाजचे कान भरत आहे आर्या, फुकटचा सल्लाही दिला, म्हणाली, “तिने दगा दिला आता…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 29, 2024 | 11:23 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 arya talks front of arbaaz about nikki

अरबाज व आर्याची मैत्री होताच निक्की विरोधात भरले त्याचे कान, प्रोमो समोर

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता स्पर्धकांमध्ये वाद झाले असून दोन्ही गट एकत्र येऊन आता निक्की विरोधात लढाई करताना दिसत आहेत. भाऊच्या धक्क्यावर टीम ए चा पर्दाफाश झाल्यानंतर निक्कीने टीम ए मधून एक्झिट घेण्याचं ठरवलं. त्यामुळे टीम ए मधील स्पर्धक आणि टीम बी मधील स्पर्धक हे एकत्र येत निक्कीला भारी पडताना दिसत आहेत. निक्की व अरबाज यांच्यात अगदी पहिल्या दिवसापासून मैत्रीचं, प्रेमाचं नातं फुलताना पाहायला मिळालं आणि हे नातं साऱ्यांना आवडू लागलं होतं. मात्र भाऊचा धक्का झाल्यानंतर निक्कीने अरबाज बरोबरचेही मैत्रीचं नातं तोडून टाकलं.

तर टीम बी मधील आर्याच अगदी पहिल्या दिवसापासूनच टीम ए मधील कोणत्याही स्पर्धकाशी पटत नव्हतं. निक्की बरोबर तर तिचा जोरदार वाद झालेलाही पाहायला मिळाला. त्यानंतर टास्क दरम्यान ‘बिग बॉस’ यांनी निखिल व अभिजीतची जोडी जुळवली तर अरबाज व आर्याची जोडी या टास्क दरम्यान एकत्र आली. त्यामुळे आर्या अरबाजबरोबर बरेचदा घरातील सदस्यांबरोबर चर्चा करताना दिसली. अशातच आता आर्या बेडरुम एरियामध्ये असते तेव्हा ती अरबाज बरोबर निक्की बाबत चर्चा करताना दिसत आहे. यावेळी आर्या निक्की विरोधात अरबाजचे कान भरवताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : अरबाज ढसाढसा रडलेला निक्कीला पाहवेना, त्याच्या जवळ गेली पण…; अभिजीतला म्हणाली, “आम्ही एकत्र आलो तर…”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आर्या अरबाजला बोलते, “मी स्वतः या परिस्थितीतून गेली आहे. मला असं तुला नाही पाहवत आहे. नको असं करु. तुला बोलायचं असेल तर बोल पण एक गोष्ट लक्षात ठेव तिने तुला यापुढे कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरुन तुला दगा दिला तर तू तिच्याशी सगळं क्लिअर कर. अरबाज तू सगळं क्लिअर कर. आणि हे लक्षात ठेव की, याच्यनांतर तू तिला हे नको करु असं सांगायलाही जाणार नाहीस, कारण जर तिला सांगितलं हे नको करु तर ती ते मुद्दाम करते”. यावर अरबाज फक्त ‘हो’ असं म्हणतो.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “मला पार्टनर बनायचं नाही”, टास्कमुळे अभिजीत-निक्की यांच्यात फूट?, गायकाच्या निर्णयावर सूरज-अरबाजने केला सॅल्युट

आता आर्याने निक्की विरोधात अरबाजचे कान भरले आहेत. आर्या व अरबाज सध्या टास्कमुळे एकत्र असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे बरेचदा दोघेही एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत. शिवाय निक्कीला जळवण्यासाठी आर्या व अरबाज प्रेमाचं नाटक करतानाही दिसत आहे.

Tags: arya jadhav agianst nikki tambolibigg boss marathibigg boss marathi 5
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

soldier duty over marriage
Social

हळद फिटली नसतानाही जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कामावर रुजू, आई-वडील भावुक तर पत्नीचा खंबीर पाठिंबा, मन हेलावणारा व्हिडीओ

मे 9, 2025 | 11:22 am
Akshay Kelkar Haldi Ceremony
Entertainment

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी

मे 9, 2025 | 10:56 am
Which Cooking Oil Is Good
Lifestyle

‘या’ तेलामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिकाधिक वाढतंय, जेवणात कोणतं तेल वापरणं अधिक उत्तम?, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार…

मे 8, 2025 | 7:00 pm
Video Viral From Pakistan
Social

“आम्ही भारताला थांबवूच शकलो नाही आणि…”, पाकिस्तान नागरिकाकडूनच भारताचा जयजयकार, पाक सैन्याचं सत्य समोर आणत…

मे 8, 2025 | 4:00 pm
Next Post
Paaru Marathi Serial Update

Paaru Marathi Serial : आदित्यसमोर येणार दिशाचा खरा चेहरा, प्रिया-प्रीतमच्या नात्याला मान्यता देत शिकवणार धडा, मोठा ट्विस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.