Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धकांमध्ये वाद होऊन स्पर्धकांमध्ये फाटा फूट झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. भाऊचा धक्का झाला तेव्हा पासून टीम ए मध्ये फूट पडली असल्याचं पाहायला मिळत आहे. टीम ए मधील स्पर्धकांचा खरा चेहरा अचानक निक्की समोर आल्याने निक्कीने या टीममधून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी निक्कीने टीम ए बरोबर असलेल्या तिच्या मैत्रीचा जराही विचार केला नाही व त्यांच्याशी चर्चा केली नाही. ‘बिग बॉस’च्या घरात निक्कीने जेव्हा प्रवेश केला तेव्हापासून ती चर्चेत आलेली पाहायला मिळाली. ‘बिग बॉस’च्या घरात येण्यापासूनच तिच्या व अरबाजमध्ये अनोखं नातं पाहायला मिळालं. ‘बिग बॉस’च्या घरात अरबाज व निक्की यांच्यात प्रेमाचे बंध फुलतानाही पाहायला मिळाले. त्यामुळे दोघेही बरेचदा एकत्र वेळ घालवताना दिसले.
एकत्र गेम प्लॅन करताना दिसले. मात्र भाऊचा धक्का झाल्यानंतर अचानक निक्कीने टीम ए आणि अरबाजची साथ सोडल्याने त्यांच्या गेम प्लॅनवर पाणी फेरलं. ‘बिग बॉस’ यांनी दिलेल्या टास्क दरम्यान निक्की व अभिजीत यांची जोडी लावण्यात आली तर अरबाज बरोबर आर्याची जोडी लावण्यात आली. त्यामुळे संपूर्ण आठवडा निक्की व अभिजीतला एकत्र घालवावा लागणार आहे. मात्र निक्की व अभिजीतची मैत्री ही पहिल्या दिवसापासून अरबाजला खटकत होती त्यावरुन अधून मधून त्यांच्यात वादही होत होते आणि आता तर ‘बिग बॉस’ नंतर पूर्ण एक आठवडा या जोड्यांनी एकत्र राहण्याचं सांगितल्याने अरबाजला आणखीनच वाईट वाटू लागलं. दोघेही एकमेकांशी बोलत नसताना निक्की सतत अरबाजला टोमणे देताना दिसली. त्यामुळे अरबाचा रागही अनावर झालेला पाहायला मिळाला. यामुळे अरबाजने ‘बिग बॉस’च्या घरात आदळाआपट केलेली दिसली. अशातच कालच्या भागात असं पाहायला मिळालं की, निक्कीचं वागणं पाहून आणि तिच्या पासून दूर जाऊन अरबाजला खूप मानसिक त्रास झाला आणि त्याला अश्रू अनावर झाले.
निक्की लिव्हिंग एरियामधून जाताना अभिजीतला “बाजूने चालत जाऊया. ऊगाच कोणाला धक्का लागला, तर मुद्दा होईल”, असं सांगते. निक्कीचा हा टोमणा ऐकून अरबाज चांगलाच भडकतो. “तुला जे काही बोलायचंय ते मला थेट सांग” असं तो निक्कीला स्पष्ट सांगतो. त्यानंतर तो बेडरुममध्ये जाऊन रडू लागतो. अरबाजला रडताना पाहून निक्कीला सुद्धा वाईट वाटतं. ती अरबाजजवळ येते पण, अरबाज हात जोडून तिला “मी खूप मेहनत करुन इथपर्यंत आलो आहे. माझ्या रागामुळे मी आता माझं कोणतंच नुकसान होईल असं वागणार नाही. प्लीज तुझ्यासमोर मी हात जोडतो. प्लीज निक्की मला टोमणे नको मारूस”, असं सांगत रडतो. यानंतर निक्की त्याला सॉरी बोलून निघून जाते.
एकीकडे अरबाज भावुक होतो. तर, दुसरीकडे निक्की अरबाजसाठी अभिजीतसमोर ढसाढसा रडते. “मला घरातले लोक त्याच्याशी बोलू देत नाहीत हा माझ्यावर अन्याय आहे. महत्त्वाचं म्हणजे तो मुलगा या सगळ्यांचं ऐकून दाबून राहतोय. कारण, तो एकटा खेळू शकत नाही. त्याच्याशी बोलायची मला प्रचंड इच्छा आहे. मी त्या मुलासाठी काय नाही केलं? मी कुठे कमी पडले? आता घरातले लोक त्याला माझ्याशी बोलू देत नाही आहेत. यासाठी मी काय करु? हे सगळे लोक खूप घाण आहेत. त्यांना वाटतंय मी व अरबाज एकत्र आलो तर त्यांचा पत्ता कट होईल. त्याला मी हवी आहे पण, तो मनात सगळं दाबून ठेवतोय”, असं सांगत निक्कीने अभिजीतसमोर आपलं मन मोकळं केलं.