शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : टास्कसाठी काहीही! अंकिताने वर्षा यांना जमिनीवर पाडलं, खेचलं अन्…; ‘कोकण हार्टेड गर्ल’वर प्रेक्षक नाराज

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 25, 2024 | 9:39 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 ankita walawalkar and varsha usgaonakar fight

Bigg Boss Marathi 5 मध्ये कॅप्टन्सी टास्कसाठी अंकिता आणि वर्षा यांच्यात होणार खेचाखेची

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. हा खेळ संपायला आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे अंतिम लढतीत जाण्यासाठी घरातील स्पर्धक एकमेकांना भिडताना पाहायला मिळत आहेत. अशातच बिग बॉसदेखील या स्पर्धकांमध्ये ट्विस्टद्वारे भांडण व वाद घडवून आणत असल्याचे पाहायला मिळत आहे. अरबाज पटेल हा घरचा कॅप्टन होता, मात्र तो या घरातून एलिमिनेट झाल्यामुळे आता बिग बॉसच्या घरात कुणीच कॅप्टन नाही आणि यामुळे घरात कामावरुन अनेकदा वाद होतात. त्यामुळे घरात कॅप्टन होऊन कामे वाटली जावी यासाठी बिग बॉस कडून एक नवीन टास्क देण्यात आला. (Bigg Boss Marathi 5New Promo)

सांगकामे आणि मालक असं या नवीन टास्कचे नाव असून या टास्कमध्ये जिंकणारी टीम ही मालक असणार आहे आणि पराजित होणारी टीम सांगकामे. यात एक टीम अंकिता, पॅडी, अभिजीत आणि जान्हवी अशी आहे तर दुसरी टीम, डीपी, सूरज, वर्षा व निक्की अशी आहे. पहिल्या फेरीत अंकिता व निक्की यांच्यात चांगली लढत होते. पण लगोरी पूर्ण न झाल्याने निकाल अनिर्णित लागतो. हेच पॅडी व डीपी यांच्याबाबतही होते. अशातच या टास्कचा एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, ज्यात अंकिता व वर्षा एकमेकींना भिडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – मराठीतील तगडी स्टारकास्ट, गौतमी पाटीलचं गाणं अन्…; Like आणि Subscribeच्या दिग्दर्शकांनी सांगितला संपूर्ण प्रवास

या नवीन टास्कमध्ये अंकिता सुरुवातीला चांगला खेळ खेळते मात्र वर्षा ही तिला चांगल्याच भिडतात. पण वर्षा यांना प्रतिउत्तर करताना अंकिता त्यांचा हात आणि पाय खेचण्याचा प्रयत्न करते.एकीकडे अंकिता वर्षा यांना खाली ढकलून देत असल्याचेही पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे ती त्यांना जमिनीवर खेचत असल्याचेही पाहायला मिळत आहे. या दरम्यान निक्की वर्षा यांची बाजू घेत मध्ये मध्ये ताई चिपकुन बसा, तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात ताई..,हा कुस्तीचा गेम नाहीये, किती घाणेरडा गेम खेळत आहे ही” असं अंकिता विरुद्ध बोलताना पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – 25 September Horoscope : कुंभ राशीच्या लोकांची नोकरीमध्ये आणि कर्क राशीच्या लोकांची व्यवसायामध्ये स्थिती नेमकी कशी? जाणून घ्या…   

दरम्यान, या लगोरी टास्कमध्ये आतापर्यंत दोन फेऱ्या झाल्या असून यात एकाही टीमला बाजी मारता आलेली नाही. त्यामुळे आजच्या भागात स्पर्धकांमध्ये या टाकवरून काय राडा होणार आहे. हे पाहण्यासाठी प्रेक्षक चांगलेच आतुर आहेत. ६ ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले होईल आणि या आठवड्यासाठी सर्वच स्पर्धकांना नॉमिनेट केले जात आहे, असेही जाहीर करण्यात आले. त्यामुळे सर्व स्पर्धकांसाठी प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. उर्वरित १४ दिवसांमध्ये या स्पर्धकांनी दिसणं आणि प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवणं फार गरजेचं आहे.

Tags: ankita walawalkarbigg boss marathi 5varsha usgaonkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
Next Post
Urmila Matondkar filed for divorce from her husband Mohsin Akhtar Mir after eight years of marriage

Urmila Matondkar Divorce : उर्मिला मातोंडकर लग्नाच्या आठ वर्षांनंतर पतीपासून होणार विभक्त?, घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.