Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सगळेच स्पर्धक धुमाकूळ घालताना दिसत आहेत. सध्या या पर्वातील निक्की तांबोळी व अरबाज पटेल यांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात निक्की तांबोळी व अरबाज पटेल यांचं नातं बहरत असताना त्यांच्या नात्यात दुरावा आला. कारण निक्कीच्या पाठी अरबाजने केलेलं गॉसिप तिला खटकलं. रितेश देशमुखने भाऊंच्या धक्क्यावर अरबाजचा खरा चेहरा निक्कीसमोर आणला त्यामुळे निक्कीने अरबाजबरोबरची मैत्री तोडली. इतकंच नव्हे तर तिने टीम ए मधून एक्झिटही घेतलेली पाहायला मिळाली.
यानंतर अरबाज व निक्की यांच्यात दुरावा आला असल्याचं पाहायला मिळालं. एकमेकांची तोंडही बघायची नाही म्हणत अरबाज व निक्की हे एकमेकांच्या विरोधात उतरले. दोघांमध्ये तुफान वाद पाहायला मिळत असताना घरातल्या सर्व स्पर्धकांनी अरबाजला पाठिंबा दिला. आणि निक्की विरोधात बरंच भाष्य केलं. अशावेळी अरबाजला निक्कीने मारलेल्या टोमण्यांनी बराच त्रास झाला. निक्कीपासूनचा दुरावा अरबाजला असह्य झाला आणि तो रडू लागला. तेव्हा निक्कीलाही अश्रू अनावर झाले.
मात्र या सगळ्यानंतर कालच्या भागात हा काहीसा भास होता असं वाटत अरबाज व निक्की एकमेकांच्या जवळ आलेले दिसले. अरबाज व निक्की जेव्हा एकत्र बोलायला आले तेव्हा त्यांच्यात जवळीक पाहायला मिळाली आणि दोघांनी एकमेकांची माफी मागत पुन्हा मैत्री केलेली पाहायला मिळाली. मध्यरात्री अरबाज निक्कीच्या कॅप्टन्सी रुममध्येही दिसला. त्यावेळी निक्कीने अरबाजला हे प्रकरण संपवायला संपूर्ण घरासमोर माफी मागायला सांगितली. मात्र अरबाजने उलट तू आधी माफी माग असं सांगितलं.
निक्कीनंतरच्या वादानंतर अरबाज तिच्या विरोधात घरच्यांसमोर बरंच काही बोलला. आता पुन्हा त्याने स्वतःहून निक्की कडे गेलेलं घरच्यांना पटणार नाही असं अरबाजला वाटत आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, अरबाज निक्कीसाठी हार्ट काढतो. आणि मिस यु असं लिहितो. त्यावर निक्की येत, “हे काय केलं आहे” असं म्हणत त्या हार्टच्या इथे “अरबाज पटेल डरपोक आहे”, असं लिहिते. हा प्रोमो पाहून अरबाजच्या प्रेमाचा अपमान त्याच्या लक्षात येईल का?, अरबाज निक्कीसाठी घरच्यांना दुखावणार का हे पाहणं रंजक ठरेल.