Bigg Boss Marathi 5 : पहिल्या दिवसापासून घरातील दोन व्यक्तींची जोरदार चर्चा होती. अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी या दोन नावांमुळे ‘बिग बॉस मराठी’चा प्रत्येक आठवडा गाजला होता. त्यांच्या वागण्यावर प्रेक्षकांमधूनही नाराजीचे सूर उमटत होते. तसेच वारंवार या दोघांनाही घराबाहेर काढण्याची विनंती प्रेक्षकांकडून केली जात होती. पण आता अरबाज पटेल घराबाहेर पडला असून त्याचा खेळ आता संपला आहे. अरबाज बाहेर पडताना निक्की अगदी ओक्साबोक्शी रडू लागली. कारण घरात निक्कीला अरबाजशिवाय कुणीच आधार नव्हता. घरातील कुणालाच निक्कीचं वागणं पटत नाही. पण अरबाज आणि निक्कीचे सूर घरात चांगले जुळले होते. पण आता अरबाज घराबाहेर गेल्यामुळे निक्कीचा महत्त्वाचा आधार गेला आहे. (Bigg Boss Marathi 5 New Promo)
या आठवड्यात रितेश देशमुख नसल्यामुळे ‘बिग बॉस’कडून एलिमिनेशनची प्रक्रिया पार पडली. या आठवड्यासाठी अरबाज पटेल, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, वर्षा उसगांवकर आणि जान्हवी किल्लेकर हे कलाकार नॉमिनेट होते. त्यामध्ये प्रत्येक सदस्यासमोर एक बॅग ठेवली होती. त्यामध्ये सेफ असं कार्ड ठेवण्यात आलं होतं. यामध्ये सूरज, जान्हवी आणि वर्षाताई हे तिघे जण सेफ झाले. पण निक्की आणि अरबाज डेंजर झोनमध्ये होते. यामध्ये अरबाजचा खेळ संपला असल्याचं ‘बिग बॉस’ने जाहीर केलं.
आणखी वाचा – आधी वडील नंतर भावाचं झालं होतं निधन, अपूर्वा नेमळेकर एकटीच पडली, म्हणाली, “थोडा वेळ रडून…”
अशातच आता निक्कीचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यात अरबाज नंतर निक्की घरात पूर्णपणे एकटी पडल्याचे जाणवत आहे, अरबाजनंतरची निक्कीची झालेली अवस्था समजून ‘बिग बॉस’नेही या प्रोमोला ‘अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी’ हे गाणं लावलं आहे. तसंच या प्रोमोमध्ये निक्की अरबाज तू कुठे गेला आहे मला सोडून असं म्हणताना दिसत आहे. तसंच “तुझ्या नावाचा कप घेतला आहे. पण तूच या घरात नाहीयेस” असंही स्वत:शीच म्हणत आहे. यानंतर निक्की स्वत:ला असं म्हणते की, “आता ही राणी हलली आहे असं मला वाटत आहे”.
दरम्यान, गेल्या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून संग्राम व अरबाज या दोन स्पर्धकांनी निरोप घेतला आहे. त्यामुळे आता घरातली स्पर्धा दिवसागणिक उत्कंठावर्धक होत चालली असल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय ‘बिग बॉस मराठी’चा १०० दिवसांचा खेळ आता ७० दिवसांतच संपणार असल्याच्या चर्चाही सोशल मीडियावर सुरु आहेत. त्यामुळे आता या घरात पुढे काय काय होणार आहे? हे येतया काळात प्रेक्षकांसमोर येईलच