मेघा घाडगे काही दिवसांपासून एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. मेघाने सोशल मीडियावरून शेअर केलेल्या पोस्टवरून तिची तब्येत ठीक नसल्याचं कळतंय. याआधी देखील मेघाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली होती. तेव्हा देखील अभिनेत्री हॉस्पिटलमध्ये होती. यानंतर आता मेघाने पुन्हा एकदा इन्स्टाग्राम अकाऊंटवरून केलेली पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. (Megha Ghadge Post)
मेघाने पुन्हा एकदा हॉस्पिटलमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती आजारी असल्याचं पाहायला मिळत आहे. मेघाने हा व्हिडीओ शेअर करत त्याखाली कॅप्शन देत, “बुखार. ३१ डिसेंबर येत आहे. किंग करोना परत आला आहे. कृपया काळजी घ्या मित्रमैत्रिणींनो. २०२४ तुम्हा सर्वांना निरोगी, सुख, समृद्धीने भरभरून जाओ आणि यश मिळो” असं म्हटलं आहे. यावरुन मेघा पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालं असल्याची चर्चा आहे.
मेघाने शेअर केलेल्या या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली आहे. तर काहींनी तिच्या या पोस्टवर कमेंट करत काळजी घ्यायला सांगितलं आहे. याआधी मेघाने वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या पोस्टनेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मेघाने शेअर केलेली पोस्ट तिने थेट हॉस्पिटलमधून केलेली पाहायला मिळत होती. त्यामुळे तिच्या या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यावेळी थेट हॉस्पिटलमध्ये केक घेऊन जात तिच्या कुटुंबीयांनी तिचा वाढदिवस हॉस्पिटलमध्ये साजरा केला होता.
‘बिग बॉस मराठी ४’ मध्ये झळकणारी लोकप्रिय अभिनेत्री मेघा घाडगे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. ती नेहमीच आपले फोटो व व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. आजवर मेघाने आपल्या अप्रतिम नृत्यकौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिचा अभिनय व नृत्य यामुळे ती कायमच चाहत्यांमध्ये चर्चेत असते.