मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मेघा घाडगे पुन्हा रुग्णालयात दाखल?, हॉस्पिटलमधील व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “करोना परत आला आहे कृपया…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 29, 2023 | 4:39 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Megha Ghadge Post

मेघा घाडगे पुन्हा रुग्णालयात दाखल?, हॉस्पिटलमधील व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "करोना परत आला आहे कृपया…"

मेघा घाडगे काही दिवसांपासून एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. मेघाने सोशल मीडियावरून शेअर केलेल्या पोस्टवरून तिची तब्येत ठीक नसल्याचं कळतंय. याआधी देखील मेघाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली होती. तेव्हा देखील अभिनेत्री हॉस्पिटलमध्ये होती. यानंतर आता मेघाने पुन्हा एकदा इन्स्टाग्राम अकाऊंटवरून केलेली पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. (Megha Ghadge Post)

मेघाने पुन्हा एकदा हॉस्पिटलमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती आजारी असल्याचं पाहायला मिळत आहे. मेघाने हा व्हिडीओ शेअर करत त्याखाली कॅप्शन देत, “बुखार. ३१ डिसेंबर येत आहे. किंग करोना परत आला आहे. कृपया काळजी घ्या मित्रमैत्रिणींनो. २०२४ तुम्हा सर्वांना निरोगी, सुख, समृद्धीने भरभरून जाओ आणि यश मिळो” असं म्हटलं आहे. यावरुन मेघा पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालं असल्याची चर्चा आहे.

आणखी वाचा – “तिच्यासाठी एक सून घेऊन ये”, ट्रोलर्सच्या कमेंटवर करण जोहरचं चोख उत्तर, म्हणाला, “‘टाइमपाससाठी आईला सूनेची…”

मेघाने शेअर केलेल्या या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली आहे. तर काहींनी तिच्या या पोस्टवर कमेंट करत काळजी घ्यायला सांगितलं आहे. याआधी मेघाने वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या पोस्टनेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मेघाने शेअर केलेली पोस्ट तिने थेट हॉस्पिटलमधून केलेली पाहायला मिळत होती. त्यामुळे तिच्या या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यावेळी थेट हॉस्पिटलमध्ये केक घेऊन जात तिच्या कुटुंबीयांनी तिचा वाढदिवस हॉस्पिटलमध्ये साजरा केला होता.

View this post on Instagram

A post shared by MEGHA VITHAL GHADGE (@meghaghadge_official)

आणखी वाचा – अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नांनंतर मलायका अरोराही लग्नासाठी तयार, स्वतःचं खुलासा करत म्हणाली, “मी त्याच्याशी…”

‘बिग बॉस मराठी ४’ मध्ये झळकणारी लोकप्रिय अभिनेत्री मेघा घाडगे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. ती नेहमीच आपले फोटो व व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. आजवर मेघाने आपल्या अप्रतिम नृत्यकौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिचा अभिनय व नृत्य यामुळे ती कायमच चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

Tags: entertainmentmarathi actressmegha ghadgemegha ghadge dancemegha ghadge post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
bigg boss marathi fame actress sai lokur shared her new born babys naming ceremony photos on instagram

पाळणा, फुलांची सजावट अन्…; घरीच साध्या पद्धतीने सई लोकूरच्या लेकीचा बारसा पडला पार, फोटो शेअर करत म्हणाली, "आनंदी आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.