करोना काळाने प्रत्येकाला माणूसकी, आयुष्य काय असतं? याचा चांगलाच धडा दिला. करोनाचा वाढता प्रभाव पाहता लॉकडाऊन झालं. दरम्यान देशभरात जनजीवन विस्कळीत झालं. दिवस सरत असताना या आजाराचा प्रभाव वाढत गेला. मात्र यावर आरोग्य विभागाने लसही शोधून काढली. करोना लस प्रत्येक व्यक्तीने घेतली. त्यानंतर हळूहळू या आजाराचा प्रभाव कमी होत गेला. आता बहुदा पुन्हा एकदा करोना वर डोकं काढू पाहत आहे. जगभरात पुन्हा या आजाराचे रुग्ण समोर आले आहेत. मुंबई आठ ते दहा करोना रुग्ण समोर आले आहेत. त्यातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचीही प्राथमिक माहिती समोर आली आहे. अशातच आता सुप्रसिद्ध अभिनेत्रीलाही करोना झाला आहे. (Shilpa shirodkar corona positive)
‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकर करोना बाधित झाली आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे तिने स्वतः याबाबत अधिकृत माहिती दिली. तिने म्हटलं की, “नमस्कार मंडळी, मी करोना बाधित झाले आहे. तुम्हीही सुरक्षित राहा आणि मास्कचा वापर करा”. शिल्पाने सगळ्यांना पुन्हा एकदा मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. शिल्पाला करोना झाला असल्याचं कळताच चाहत्यांनी चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
आणखी वाचा – रस्त्यावर सोडलेल्या मुलीला दत्तक घेतलं, शेवटी तिनेच आईला संपवलं, बॉयफ्रेंडच्या मदतीने केलं असं काही की…
शिल्पा लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून सगळेच प्रार्थना करत आहेत. तसेच अनेक सेलिब्रिटी मंडळींनीही कमेंट केल्या आहेत. सोनाक्षी सिन्हा म्हणाली, “अरे देवा, शिल्पा तुझी काळजी घे आणि लवकर बरी हो”. जुही बब्बर म्हणाली, “देवा, कृपया तू तुझी काळजी घे”. तर चाहत्यांनीही अनेक कमेंट केल्या आहेत. लवकर बरी हो, सुरक्षित राहा, तू खूप सकारात्मक आहेस, लवकरच बरी होशील अशा अनेक कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.
आणखी वाचा – एकीकडे वडील गेले, अंत्यसंस्काराला जाताना लेकीनेही गमावला जीव, कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू अन्…
करोनाने २०२०-२१मध्ये जगभरातील लोकांना मोठा धक्का दिला होता. या गंभीर आजारात अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं. पण पुन्हा हा आजार आपल्याला होऊ नये म्हणून आतापासूनच प्रत्येकाने शक्य तितकी स्वतःची काळजी घ्या.