मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रात्रभर रडते, लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज अन्…; तरुण वयातच ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीला गंभीर आजार, परिस्थिती अशी की…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 14, 2025 | 12:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
sana makbul suffer from liver disease

रात्रभर रडते, लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज अन्...; तरुण वयातच ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीला गंभीर आजार, परिस्थिती अशी की...

सुप्रसिद्ध अभिनेत्री सना मकबुल गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराचा सामना करत आहे. काही दिवसांपूर्वी तिने रुग्णालयातील उपचारादरम्यानचा फोटो शेअर करत चाहत्यांना याबाबत माहिती दिली होती. आता सनाने तिच्या आजाराबाबत स्पष्टपणे सांगितलं आहे. लिव्हर संबंधित आजाराचा सना सामना करत आहे. गरज पडल्यास लिव्हर ट्रान्सप्लांट तिला करावं लागणार आहे. मात्र ते होऊ नये यासाठी सना देवाकडे प्रार्थना करत आहे. गंभीर आजाराचा हिंमतीने सामना करण्यासाठी स्वतःचीच समजूत काढत आहे. याचविषयी सनाने आता भाष्य केलं आहे. (sana makbul suffer from liver disease)

सनाने म्हटलं की, “मी गेल्या काही काळापासून ऑटोइम्युन हेपेटायटिस आजाराने ग्रस्त आहे. काही दिवसांपासून माझी तब्येत आणखीनच बिघडली आहे. लिव्हरची रोगप्रतिकारक शक्तीही आता पूर्णपणे कमी झाली आहे. त्यानंतर लिव्हर सिरोसिसचं मला निदान झालं आहे. पण या संपूर्ण प्रसंगाचा मी हिंमतीने सामना करत आहे”. सना तिला झालेल्या गंभीर आजाराला मोठ्या हिंमतीने सामोरी जात आहे. तसेच अचानक आजाराचे निदान झाल्यानंतर तिचं शरीरही कमकूवत झालं आहे. सना तिची रोगप्रतिकारक शक्ती वाढवत आहे.

आणखी वाचा – करिष्मा कपूरच्या पूर्वाश्रमीच्या पतीच्या अंत्यसंस्कारात अडथळा, २४ तास उलटूनही पार्थिव भारतात पोहोचले नाही, कारण…

View this post on Instagram

A post shared by Sana Makbul (@divasana)

सनाने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, “लिव्हर ट्रान्सप्लांटपासून दूर राहण्याचाच डॉक्टर आणि मी प्रयत्न करत आहे. लिव्हर ट्रान्सप्लांट आम्हाला करायचं नाही. इम्युनथेरपीही मी सुरु केली आहे. यामध्ये मला खूप थकवा येतो. लिव्हर ट्रान्सप्लांट माझ्याबाबतीत होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. त्यासाठी मी प्रयत्न करत आहे. हे अजिबात सोप नाही. पण इतक्या लवकर मी हार मानणार नाही”.

आणखी वाचा – कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर दीपिका कक्कर रुग्णालयातून घरी परतली, लेकाला घट्ट मिठी मारली आणि…; नवऱ्याचा हात धरुन…

पुढे ती म्हणाली, “काही दिवस मी रडते तर काही दिवस मी हसत असते. पण प्रत्येक दिवशी मी यामधून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न करते”. आजारामुळे सना पूर्णपणे खचली आहे. पण त्यातही ती स्वतःची समजूत काढत आहे. हिंमतीने नव्याने उभं राहण्याचा प्रयत्न करत आहे. आजारपणामुळे तिची सुरु असलेली अनेक कामं रखडली आहेत. क्षणात सगळी कामं थांबली. काम मिळवण्यासाठी बरीच वर्ष मेहनत केली. पण आता हाती यश आल्यानंतर आजारपण आल्यामुळे सना पूर्णपणे ढासाळली आहे.

Tags: bollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
Dipika Kakar First Post After Tumor Surgery

कर्करोगावरील शस्त्रक्रियेनंतर दीपिका कक्करची पहिली पोस्ट, डॉक्टर, नर्सचे मानले आभार, म्हणाली, "११ दिवस कठीण होते परंतु…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.