रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वडील झाल्यानंतर प्रिन्स नरुलाचा आनंद गगनात मावेना, पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा, एकटक बघतच बसला अन्…

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 22, 2024 | 12:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss 9 Prince Narula and his wife Yuvika Chaudhary shared first photo with their daughter on social media

प्रिन्स नरुला व युविका चौधरी यांनी लेकीचा पहिला फोटो केला शेअर, कलाकार व चाहत्यांनी केलं कौतुक

प्रिन्स नरुला व त्याची पत्नी युविका चौधरी यांनी लग्नाच्या ६ वर्षानंतर आई-बाबा होणार असल्याची खुशखबर सांगितली होती. ७ ऑगस्ट २०२४ रोजी युविकाच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम संपन्न झाला.  अशातच २० ऑक्टोबर रोजी त्यांनी एका चिमुकलीला जन्म दिला. युविका गरोदर असल्याची बातमी काही महिन्यांपूर्वी शेअर केली होती. त्यानंतर आता त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं आहे.  ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, प्रिन्सचे वडील जोगिंदर नरुला यांनी दोघांच्या मुलीच्या जन्माबद्दल सांगितले. यावेळी त्यांनी “होय, आमच्या घरी मुलीचा जन्म झाला आहे. त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत” अशी प्रतिक्रिया दिली. (Prince Narula and Yuvika Chaudhary Daughter)

लग्नानंतर सहा वर्षांनी प्रिन्स व युविका यांनी एका मुलीला जन्म दिला असून या चिमुकलीच्या आगमनामुळे त्यांच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छा व कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच त्यांनी आपल्या लेकीची पहिली झलक शेअर केली आहे. प्रिन्स व नरुला यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये हे जोडपे हॉस्पिटलच्या खोलीत बसलेले दिसत असून मांडीवर त्यांची कन्या आहे.

View this post on Instagram

A post shared by Yuvika chaudhary (@yuvikachaudhary)

 

आणखी वाचा – Navri Mile Hitlerla : प्रेम बहरता बहरता एजे-लीलामध्ये होणार गैरसमज, नात्यात पुन्हा दुरावा येणार

या फोटोमध्ये प्रिन्स व युविका यांनी आपल्या लेकीचा चेहरा लपवला असून हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये युविका हॉस्पिटलच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तर प्रिन्स कॅज्युअल लूकमध्ये आहे. त्यांनी शेअर केलेल्या या फोटोमध्ये आई-वडील झाल्याचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. त्यांनी शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांकडून व कलाकारांकडून लाईक्स व कमेंट्सद्वारेही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

आणखी वाचा – ‘आहट’ हॉरर शो आता मराठीत, सोनी मराठीकडून घोषणा, २० वर्षांनी पुन्हा एकदा पसरणार भीतीचे सावट

दरम्यान, युविका चौधरी व प्रिन्स नरुला यांच्या लव्हस्टोरीची खूप चर्चा झाली होती. हे जोडपे ‘बिग बॉस ९’ मध्ये भेटले होते. या शोमधूनच त्यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेम निर्माण झाले. या जोडप्याने २०१६ मध्ये साखरपुडा केला होता. यानंतर त्यांनी दोन वर्षांनी २०१८ मध्ये लग्न केले. मोठ्या थाटामाटात त्यांचे लग्न पार पडले आणि त्याची बरीच चर्चा झाली. अशातच लग्नाच्या सहा वर्षांनी या दोघांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे.

Tags: Prince Narula and Yuvika Chaudhary DaughterPrince Narula and Yuvika Chaudhary Daughter Marathi NewsPrince Narula and Yuvika Chaudhary's daughter first photo News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss 18 salman khan show Esha Singh and Avinash Mishra love story will start in the house

Bigg Boss 18 मध्ये प्रेमाचे वारे, ईशा-अविनाशचं फुलतंय नातं, जोडी जमणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.