Bigg Boss 19 Pranit More : ‘बिग बॉस हिंदी’ने सध्या सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. सततची भांडण, वाद, मैत्री या सगळ्याची निरनिराळी समीकरण ‘बिग बॉस’च्या घरात पाहणं रंजक ठरतंय. ‘बिग बॉस’च्या घरातील टास्क साऱ्या स्पर्धकांना एकत्र आणतात. तर काहीवेळा या टास्कमुळेच स्पर्धकांध्ये फूट पडते. अशाच एका टास्कचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यावेळी घरातील स्पर्धकांसाठी कुटुंबाकडून भावनिक पत्र आली होती जी पाहून या स्पर्धकांच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहायला मिळालं. यांत पहिलंच पत्र आपल्या महाराष्ट्रातील लाडक्या मराठमोळ्या प्रणित मोरेच होतं. हे पत्र नेहा चुडासीमाच्या हाती लागलं आणि तिने ते पत्र सुखरुप प्रणितच्या हाती दिलं.
कुटुंबाकडून आलेलं पत्र वाचताना प्रणितच्या अश्रूंचा बांध फुटला. नेहमीच सगळ्यांना हसवणारा प्रणित ‘बिग बॉस’च्या घरात रडताना दिसला. घरुन आलेलं पत्र वाचताना तो भावुक झाला. यावेळी या शोमधील इतर सदस्यही रडताना दिसले. प्रणितला घराकडून आलेल्या पत्रात असं लिहिलं होतं की, “प्रिय प्रणीत, तुला ‘बिग बॉस’च्या घरात जाऊन दोन महिने झालेत आणि या दोन महिन्यांत एकही दिवस असा नाही गेला की, आम्हाला तुझी आठवण आली नाही. यंदाची दिवाळी तुझ्याशिवाय अधुरीच आहे. पण, तुला टीव्हीवर बघून आम्हाला खूपच अभिमान वाटतोय”.
पुढे हे पत्र वाचत तो म्हणाला, “आमच्या भावना या पत्रातून व्यक्त करता येणार नाहीत, पण खरी मैत्री कशी असावी हे तुझ्यामुळे दिसत आहे. मित्रांबरोबर त्यांच्या कठीण काळात ठामपणे उभं राहणं, त्यांना पाठिंबा देणं हे या घरात तू अगदी उत्तम पद्धतीने करत आहेस, जे बघून छान वाटत आहे. आई-बाबा पूजा वगैरे सोडून दिवसभर फक्त तुलाच पाहत असतात. सगळेजण तुला विजेता झालेलं पाहत आहेत आणि तूच विजेता होणार हे नक्की… गौरव खन्नाला खूप धन्यवाद. तो तुझा खरा मित्र आहे”.
आणखी वाचा – “मुलगा मुळचा आगाऊ असेल”, KBC प्रकरणावर मराठी अभिनेत्याची मार्मिक पोस्ट, म्हणाले, “आगाऊपणे बच्चनसाहेबांना…”
“तुमच्या मैत्रीची बाहेर फार चर्चा सुरू आहे. अभिषेक आणि अश्नूर यांनाही खूप प्रेम. त्यांनी दाखवून दिलं की, खरी मैत्री कशी असते. तू असाच खेळत राहा आणि लक्षात ठेव, फक्त आम्हालाच नाही तर या महाराष्ट्राला आणि भारताला तुझा अभिमान आहे. सगळ्यांना खूप खूप प्रेम आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!”.





