शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कोणाच्या बापामध्ये इतकी ताकद नाही”, सेटवर उशिरा पोहोचल्याच्या आरोपावरुन गोविंदा संतापला, म्हणाला, “माझी बदनामी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 17, 2025 | 3:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
govinda reaction

"कोणाच्या बापामध्ये इतकी ताकद नाही", सेटवर उशिरा पोहोचल्याच्या आरोपावरुन गोविंदा संतापला, म्हणाला, "माझी बदनामी…"

govinda reaction : बॉलीवूड स्टार गोविंदा नेहमीच चर्चेचा भाग राहिला आहे. त्यांची पत्नी सुनीता सतत अशी वक्तव्ये करत असते, ज्यानंतर ही जोडी चर्चेत आलेली पाहायला मिळाली आहे. गोविंदाबद्दल नेहमीच असे म्हटले जाते की, तो सेटवर उशिरा पोहोचायचा. आता त्यांनी या नकारात्मक प्रसिद्धीवर प्रतिक्रिया दिली आहे. तो अलीकडेच काजोल आणि ट्विंकल खन्ना यांच्या ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या शोमध्ये गेला होता. जिथे त्याने सांगितले की, जेव्हा इंडस्ट्रीतील लोक उशीरा येण्याबद्दल त्याची बदनामी करतात तेव्हा त्याला वाईट वाटते.

चित्रपटाच्या सेटवर उशिरा येण्याच्या त्याच्या सवयीबद्दल त्याने दीर्घकाळ चाललेल्या अफवांवर प्रतिक्रिया दिली. ज्याने काही व्यावसायिक संबंध बिघडवले होते. गोविंदाने स्पष्टीकरण देत ही अफवा पसरवणाऱ्यांना फटकारले. गोविंदा म्हणाला, “मी वेळेवर न आल्यामुळे माझी बदनामी झाली. मी म्हणालो कोणाच्या वडिलांमध्ये पाच शिफ्ट्स करुन वेळेवर येण्याची ताकद आहे. ते शक्य नाही, होऊ शकत नाही. माणूस एवढं शूटिंग कसं करेल? इथे फक्त एका चित्रपटात लोक थकतात”.

आणखी वाचा – “अनेकदा आजारपण…”, वयाच्या ३० व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा झालेला गर्भपात, म्हणाली, “तीव्र रक्तस्त्राव होत होता आणि…”

गोविंदाच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आपल्या कॉमिक टायमिंग आणि डान्स मूव्ह्सने सर्वांची मने जिंकली आहेत. ८०-९० च्या दशकात त्यांना खूप प्रेम मिळाले. ते अव्वल अभिनेत्यांपैकी एक होते. ‘इल्जाम’, ‘लव ८६’, ‘इश्क में जीना इश्क में मरना’ यांसारख्या चित्रपटात काम केले. त्यानंतर डेव्हिड धवनसह ‘कुली नंबर १’, ‘हीरो नंबर’, ‘राजा बाबू’ आणि ‘पार्टनर’ यांसारख्या कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केले. त्यांची चित्रपट कारकीर्द तीन दशकांची आहे.

आणखी वाचा – “अनेकदा आजारपण…”, वयाच्या ३० व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा झालेला गर्भपात, म्हणाली, “तीव्र रक्तस्त्राव होत होता आणि…”

२०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रंगीला राजू’ या चित्रपटात तो शेवटचा दिसला होता. आता गोविंदा अनेकदा रिॲलिटी शोमध्ये पाहुणे म्हणून येतो. जिथे तो त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलतो.

Tags: bollywood actorgovindagovinda reaction
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
tharala tar mag

'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजीच्या भूमिकेत रोहिणी हट्टंगडी?, प्रोमो पाहून नेटकऱ्यांच्या कमेंट्स, उत्सुकता वाढली

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.