Karanveer Mehra Relationship : यंदाचं ‘बिग बॉस १८’ हे पर्व विशेष गाजलं. या पर्वातील प्रत्येक स्पर्धकाने धुमाकूळ घालत साऱ्यांचं लक्ष केंद्रित केलं. यंदाच्या या पर्वातील एका स्पर्धकाची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली ती म्हणजे करणवीर मेहरा. करणवीर मेहराने यंदाच्या या पर्वाच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. ‘बिग बॉस १८’च्या घरात करणवीर विशेष चर्चेत राहिला. सध्या करणवीर त्याच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे. अशातच आता करणवीरने चुम दरांगबरोबर प्रेमात असल्याचा खुलासा केला आहे. व्हॅलेंटाईन डेचे औचित्य साधत करणवीरने चुम दरांगवरील प्रेमाची कबुली दिली. दोघांचा एकत्रित एक फोटो सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे.
चूमने तिच्या इन्स्टाग्रामवर व्हॅलेंटाईन डेचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यापैकी एका व्हिडीओमध्ये करणवीर चुमसमोर तिच्या मनातील भावना व्यक्त करताना दिसत आहे. करण म्हणाला, “गुलाब लाल आहे, वांग जांभळं आहे. मला कोणाचीही पर्वा नाही, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो”. करणवीरने असं म्हणताच चुम लाजताना दिसत आहे. दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी असे गृहीत धरले आहे की दोघांनी एकेमेकांवरील प्रेमाची कबुली दिली आहे.
करणवीर आणि चुम पहिल्यांदा ‘बिग बॉस १८’च्या घरात भेटले. जिथे हे दोघेही मित्र बनले आणि करणने चुमच्या हृदयात आपली जागा निर्माण केली. ‘बिग बॉस’च्या घरातही बर्याच वेळा करणवीर आणि चुम एकमेकांसह प्रेमाच्या गप्पा मारताना दिसले.पण त्यावेळी चुम करणवीरला त्याचा चांगला मित्र समजत होती. परंतु हा व्हिडीओ समोर आल्यानंतर असे दिसते की दोघेही लवकरच लग्न करु शकतात. दोघांच्या लग्नाच्या अनेक चर्चाही सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
आणखी वाचा – रणवीर अलाहाबादियाचे वडील चालवतात Sperm Bank, तर आई आहे स्त्रीरोग तज्ज्ञ, पालकांची सतत होतेय चर्चा कारण…
काही दिवसांपूर्वीच चुम दरांग शिल्पा शिरोडकर आणि चित्रपट निर्माते फराह खान यांच्याबरोबर दिसली होती. तिघेही शिल्पाच्या घरी मेजवानीचा आस्वाद घेताना दिसले.