Bigg Boss 18 : टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’. नुकतेच बिग बॉस चे १८ पर्व सुरु झाले असून या रिअॅलिटी शोबद्दल सध्या खूप चर्चा होत आहेत. या शोबाबत वेळोवेळी नवीन अपडेट्स समोर येत आहेत. शोमधील टास्कवरून स्पर्धकांमध्ये प्रचंड भांडण सुरु आहे. एवढेच नाही तर आता हे भांडण शिवीगाळ आणि हाणामारीपर्यंत पोहोचले आहे. अशा स्थितीत दर आठवड्याला प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न असतो तो म्हणजे या या घरात कॉन आपले स्थान टिकवून ठेवणार आणि कोणाला या घरचा निरोप घ्यावा लागणार? (Bigg Boss 18 Nomination)
‘बिग बॉस १८’बद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. या आठवड्यात एकूण पाच खेळाडूंच्या डोक्यावर नॉमिनेशनची टांगती तलवार होती. यामध्ये विवियन डिसेना, मुस्कान बामने, नायरा बॅनर्जी, अविनाश मिश्रा आणि रजत दलाल यांच्या नावांचा समावेश होता. त्यामुळे या प्रक्रियेतून मुस्कानलं घर सोडावे लागले आहे. टेलिक्रिएट्सच्या रिपोर्टनुसार, ‘बिग बॉस’च्या घरातून ‘अनुपमा’ फेम मुस्कान बामणे ही घरातून बाहेर पडली आहे. एका टास्कमुळे मुस्कानला तिला जे घर सोडावे लागले आहे.
‘बिग बॉस’ने सांगितले की, तुम्हा तिघांपैकी सारा, तजिंदर आणि मुस्कानची ‘बिग बॉस’च्या घरात वेळ संपणार आहे. यानंतर घरातील बाकीचे स्पर्धक येतात आणि या तिघांची नावे सांगतात. सर्वप्रथम, करणवीर मुस्कानचे नाव घेतो आणि म्हणतो की, ती बहुतेक हरवली आहे. मग एलिस, तेजिंदर आणि चाहत मुस्कानचे नाव घेतात. त्यामुळे मुस्कानने या घरातून निरोप घेतला आहे.
आणखी वाचा – 25 october Horoscope : कुंभ, मकर व मीन राशीच्या लोकांना शुक्रवारी मिळणार भाग्याची साथ, अधिक जाणून घ्या…
‘बिग बॉस १८’ मधून मुस्कान बामणे बाहेर होताच सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. नेटकरी त्याच्या निर्णयाबद्दल दुःखी नाहीत. तसंच अनेकांनी या निर्णय योग्य असल्याचे म्हटलं आहे. ‘बिग बॉस’मध्ये त्याचे योगदान शून्य असल्याचे बहुतेकांचे म्हणणे आहे. ती इथे ‘बिग बॉस’ खेळायला आली नव्हती, जे झालं ते योग्यच झालं. अशा प्रतिक्रिया व्यक्त करु लागले आहेत. त्यामुळे मुस्कानचे एलिमिनेशन योग्यच होते असे अनेकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, बिग बॉसच्या नुकत्याच झालेल्या भागात अविनाश आणि अरफीन यांना रेशनच्या बदल्यात कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या आवडत्या वस्तूंचा त्याग करण्याची संधी कशी मिळाली हे प्रेक्षकांनी पाहिले. यावेळी ईशाने आईची शाल अर्पण करून पीठ घेतले. त्याचवेळी शिल्पाला तिच्या पती आणि मुलाचे फोटो टाकून काही वस्तू घ्याव्या लागल्या. अशातच आगामी भागात या घरात एलिमिनेशन पार पडणार आहे.